चार गोवंशाची सुखरूप सुटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 11, 2018 09:28 PM2018-08-11T21:28:33+5:302018-08-11T21:28:50+5:30

ब्राम्हणवाडा थडीहून चांदूर बाजारकडे येणाऱ्या एक एसयूव्हीमधून चार गोवंशंची सुटका चांदूर बाजार पोलिसांनी केली. ब्राम्हणवाडा थडी टी-पॉइंटवर ही कारवाई करण्यात आली. चालकाने पळ काढला. त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Four cows are safely rescued | चार गोवंशाची सुखरूप सुटका

चार गोवंशाची सुखरूप सुटका

Next
ठळक मुद्देगुन्हा दाखल : तस्करीचा डाव उधळला

लोकमत न्यूज नेटवर्क
चांदूर बाजार : ब्राम्हणवाडा थडीहून चांदूर बाजारकडे येणाऱ्या एक एसयूव्हीमधून चार गोवंशंची सुटका चांदूर बाजार पोलिसांनी केली. ब्राम्हणवाडा थडी टी-पॉइंटवर ही कारवाई करण्यात आली. चालकाने पळ काढला. त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी एमएच ०४ बी १५८६ क्रमांकाच्या वाहनातून तीन बैल आणि एक गाय अशी एकूण चार जनावरे ताब्यात घेऊन त्यांची सुखरूप सुटका केली. त्यांना सामानाच्या केबिनमध्ये कोंबण्यात आले होते. याप्रकरणी अज्ञात आरोपीविरुद्ध गोवंश हत्या व छळ प्रतिबंधक तसेच मोटर वाहन कायद्यान्वये गुन्ह्याची नोंद करण्यात आली. ही कार्यवाही ठाणेदार अजय आकरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक आशिष चौधरी, नाईक पोलीस काँस्टबल निकेश नशीबकर यांनी केली. अधिक तपास चांदूर बाजार पोलीस करीत आहे.


ब्राह्मणवाडा पोलीस अनभिज्ञ
ब्राम्हणवाडा थडी येथे पोलीस ठाणे असतानाही त्यांना जनावरांच्या तस्करीची भनक कशी लागली नाही, हा प्रश्न आहे. नवीन फंडे वापरून या मार्गावर जनावरांची तस्करी होत असल्याचे या प्रकरणाने पुढे आले आहे.

Web Title: Four cows are safely rescued

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.