बडनेऱ्यात डेंग्यूचे चार रुग्ण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 31, 2021 04:13 AM2021-07-31T04:13:53+5:302021-07-31T04:13:53+5:30
फोटो - बडनेरा ३० पी शहराला घाणीचा विळखा, अन्य आजारही बळावले बडनेरा : शहरात डेंग्यूचे चार रुग्ण आढळून आले. ...
फोटो - बडनेरा ३० पी
शहराला घाणीचा विळखा, अन्य आजारही बळावले
बडनेरा : शहरात डेंग्यूचे चार रुग्ण आढळून आले. त्यासह अन्य आजारही बळावले आत्त. शहरात असणारा घाणीचा विळखा आजार वाढविण्यास कारणीभूत ठरत आहे. सर्वत्र डासांचा प्रादुर्भाव वाढला आहे. दवाखाने रुग्णांमुळे भरले आहेत. महापालिका प्रशासनाने स्वच्छतेवर भर द्यावा तसेच गांधी विद्यालय मार्गावरील पुलानजीकचा कचरा डेपो तात्काळ हटविण्याची मागणी नागरिक करीत आहेत.
बारीपुरा, मारवाडीपुरा व मिल चाळ परिसरात डेंग्यूचे चार रुग्ण आढळून आले, तर लगतच्याच परिसरात डेंगूसदृश आजाराचे रुग्ण पाहावयास मिळत आहे. शहरातील दवाखाने रुग्णांच्या गर्दीने भरले आहेत. मुलांमध्ये तापाची साथ अधिक प्रमाणात दिसून येत आहे. पावसाळा सुरू झाल्यानंतर येथे रुग्णसंख्येत वाढ झाली. सर्वत्र डासांचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव झालेला आहे. गांधी विद्यालय तसेच रेल्वे स्थानकाकडे जाणाऱ्या मार्गावरील पुलालगत शहरातला दररोज उचलण्यात आलेला कचरा टाकला जातो. त्या कचऱ्याच्या ढिगावर जनावरे जातात. त्यामुळे कचरा रस्त्यावर विखुरला जातो. पावसामुळे हा कचरा ओला झाला की, परिसरात प्रचंड दुर्गंधी पसरते.
शहराच्या मध्यवस्तीत हा कंपोस्ट डेपो तयार करण्यात आला. येथे कचरा टाकला जाऊ नये, यासंदर्भात अनेकदा नगरवासीयांनी मनपा झोन कार्यालय व नगरसेवकांना लेखी तक्रारी दिलेल्या आहेत. महापालिका प्रशासन व नगरसेवकांनी मुख्य मार्गावर असणारा कंपोस्ट डेपो हटविण्यासाठी प्रयत्न करावा, अशी नागरिकांची मागणी आहे. बडनेरा शहरातरिकाम्या भूखंडांवर झुडपेदेखील मोठ्या प्रमाणात वाढलेली आहेत. डासांचा वाढता प्रादुर्भाव आजार वाढवित आहे.