देवघरात दडून बसली होती चार फूट लांबीची घोरपड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 16, 2020 01:31 PM2020-07-16T13:31:11+5:302020-07-16T13:31:32+5:30
स्थानिक कठोरा नाकानजीकच्या डॉ. पंजाबराव देशमुख सभागृहाजवळी ऐका देवघरात चार फूट लांबीची घोरपड दडून बसल्याचे दृष्टीस पडली. जीवनरक्षा संस्थेद्वारा तिला पकडून पोहरा जंगलात सोडण्यात आले.
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : स्थानिक कठोरा नाकानजीकच्या डॉ. पंजाबराव देशमुख सभागृहाजवळी ऐका देवघरात चार फूट लांबीची घोरपड दडून बसल्याचे दृष्टीस पडली. जीवनरक्षा संस्थेद्वारा तिला पकडून पोहरा जंगलात सोडण्यात आले.
सदर घटनेची माहिती जीवनरक्षा संस्थेला हेल्पलाईन क्रमांकावरून देताच गौरव वºहाडे व श्रीकांत गावंडे यांनी घटनास्थळ गाठून शिताफीने घोरपडीला बंदिस्त केले. पोहरा जंगलातील नैसर्गिक अधिवासात मुक्त केले. घोरपड हा बिनविषारी सरपटणारा प्राणी आहे. पावसाळ्यात सरपटणाऱ्या प्राण्यांच्या बिळात पाणी शिरल्यामुळे त्यांचा श्वास कोंडण्यामुळे ते बिळातून जमिनीवर येतात. त्यामुळे अनेक वण्यप्राणी मानवी वस्तीत आश्रय घेत असल्याचे आढळून येत आहेत. अशावेळी नागरिकांनी न घाबरता वण्यप्राण्यांपासून सुरक्षित अंतर बाळगावे, असे आवाहन जीवनरक्षा संस्थेद्वारा करण्यात आले