विदर्भाच्या पर्यटन स्थळावर चार विदेशी पाहुण्या पक्ष्यांचा मृत्यू

By admin | Published: November 25, 2015 12:52 AM2015-11-25T00:52:07+5:302015-11-25T00:52:07+5:30

झटपट मासे पकडण्याच्या मोहात तलावात विष कालवल्याने यात शेकडो मासे मृत पडली तर, तलावातील पाणी पिल्याने ...

Four foreign visitors to the Vidarbha tourism site | विदर्भाच्या पर्यटन स्थळावर चार विदेशी पाहुण्या पक्ष्यांचा मृत्यू

विदर्भाच्या पर्यटन स्थळावर चार विदेशी पाहुण्या पक्ष्यांचा मृत्यू

Next

चिखलदऱ्यातील घटना : मासेमारीसाठी तलावात विष
नरेंद्र जावरे चिखलदरा
झटपट मासे पकडण्याच्या मोहात तलावात विष कालवल्याने यात शेकडो मासे मृत पडली तर, तलावातील पाणी पिल्याने भ्रमंतीवर आलेल्या चार विदेशी पाहुण्या पक्ष्यांचा तडफडून मृत्यू झाला. एका जखमीवर चिखलदरा येथील पशुवैद्यकीय दवाखान्यात उपचार करून वनविभागाने त्याला ताब्यात घेतले. मंगळवारी दुपारी १२.३० वाजताच्या सुमारास ही घटना एका पक्षिमित्राच्या सतर्कतेने उघडकीस आली.
चिखलदरा शहरातील गवळीपुरा परिसरातील हिन्दू स्मशानभूमी आहे. त्या लगतच पूर्व मेळघाट वनविभागाने तलाव बनविला आहे. त्यामध्ये मोठ्या प्रमाणात मासे असल्याने तेथे परिसरातील देशी विदेशी पक्षी एकच गर्दी करतात.
खाद्यान्न म्हणून मासे व पिण्याचे पाणी असल्याने परिसरात हिवाळ्यात गर्दी करतात. नेहमीप्रमाणे विदेशी पाहुणे पक्ष्यांनी चोचीने मासेमारी करीत पोट भरण्यासाठी भक्ष टिपले. मात्र काही वेळानंतर चिखलदरा शहरातील महात्मा फुले वार्ड परिसरातील नागरिकांच्या घरातील आवारात हे विदेशी पक्षी कोसळले.
तडफडत पक्षी कोसळला
स्मशानभूमी परिसरातील तलावाजवळ एक पक्षी उडत येऊन वेदांत सुरपाटणे यांच्या गोठ्यात पडला. त्यांनी त्या पक्ष्याला घरी आणले व पाणी पाजून पिंजऱ्यात ठेवले. एका पक्षिमित्राने लेखी तक्रार चिखलदरा वनपरिक्षेत्र कार्यालयात दिल्यावर दीपक गणोरकर, रामू गवई, चौधरी, तायडे या वन कर्मचाऱ्यांनी त्या विदेशी पक्ष्याला पशुवैद्यकीय दवाखान्यात नेऊन उपचार करून ताब्यात घेतले आहे.
तलावातील पाण्यात विष कालवले किंवा नाही याची तपासणी वन कर्मचाऱ्यांनी लिटमिस पेपर व इतर साहित्याने केली. मात्र त्यामध्ये विष नसल्याचे आढळून आल्याचे वन विभागाचे म्हणणे आहे. तर विष प्रयोगाने मासेमारी झाल्यावर पाण्यावर तरंगणारे मासे खाल्ल्याने या पक्ष्यांचा मृत्यू झाल्याचा कयास लावण्यात येत आहे. जखमी अवस्थेत सापडलेले पक्षी देशी की विदेशी पाहुणे याबद्दल वन विभागाजवळ वृत्त लिहिस्तोवर कुठलीच माहिती नव्हती. या संपूर्ण प्रकरणाला वनपरिक्षेत्र कार्यालयाने कुठल्याच प्रकारे गांभिर्याने घेतले नसल्याचे दिसून आले.

Web Title: Four foreign visitors to the Vidarbha tourism site

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.