चार तासांनंतर मसन्याऊद कैद

By admin | Published: May 11, 2016 12:35 AM2016-05-11T00:35:28+5:302016-05-11T00:35:28+5:30

जंगलात राहणारा एरवी नागरिकांच्या वस्तीत कधी न आढळणारा मसन्याऊद (उतमांजर) हा प्राणी शहरात आल्याने एकच खडबड उडाली.

Four hours after the Massacond prison | चार तासांनंतर मसन्याऊद कैद

चार तासांनंतर मसन्याऊद कैद

Next

नागरिकांची तोबा गर्दी : वनविभागाने चालविले 'रेस्क्यू आॅपरेशन'
दर्यापूर : जंगलात राहणारा एरवी नागरिकांच्या वस्तीत कधी न आढळणारा मसन्याऊद (उतमांजर) हा प्राणी शहरात आल्याने एकच खडबड उडाली. मंगळवारी त्याला पकडण्यासाठी वनविभागाचे चार तास 'रेस्क्यू आॅपरेशन' चालले. त्यानंतर त्याला कैद करण्यात यश मिळविले. अतिशय दुर्मिळ असलेल्या मसन्याऊद बघण्यासाठी दर्यापूरकरांनी गर्दी केली होती.
माणसाचा मृतदेह जर एखाद्या ठिकाणी गाडला असेल तर त्याला पूर्णपणे उखरण्याची ताकद या मसन्याऊदमध्ये असल्याचे जानकार सांगतात. त्यामुळे ज्या ठिकाणी मनुष्याचा मृतदेह गाढल्या जातो, त्या ठिकाणी प्रामुख्याने हे आढळतात. मंगळवारी सकाळी स्थानिक प्रबोधन गीता मंडळ शाळेजवळील एका कडू लिंबाच्या झाडावर दोन मसन्याउद (उतमांजर इंग्रजीमध्ये त्याला सिवेट कॅट) असे म्हणतात हे आढळून आले आहे. काही नागरिकांची नजर त्यांच्यावर गेल्यानंतर जंगली मांजरीप्रमाणे दिसणारा हा प्राणी पाहण्यासाठी बघ्यांची गर्दी वाढत गेली. रस्त्यावर दोन्ही बाजूला वाहने आणि बघ्यांची गर्दी वाढल्यामुळे पोलीस स्टेशन, नगर पालिका रस्त्यावर वाहतुकीला अडथळा निर्माण झाला. अंदाजे सकाळी ९ वाजता दोन मसन्याऊद झाडावर चढले. मसन्याउद आल्याची चर्चा गावभर पसरली. त्यामुळे हजारो नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. परतवाडा वनविभागाचे वनपाल गजानन आमले, वनरक्षक यांना पाचारण करण्यात आले. झाडावरून दोन्ही मसन्याऊदला पकडणे कठीण असल्याने पारधी आणि भोई बांधवांना बोलविण्यात आले. शिकारी जाळे घेवून त्यांनी ११ वाजताच्या दरम्यान मसन्याउदाला पकडण्याचा प्रयत्न केला. परंतु एक मसन्याऊद पळून गेला तर दूसरा हा लिंबाच्या झाडावरुन उडया मारत आनंद महाजन यांच्या घराजवळ गेला. त्याला जाळ्यात पकण्यात चार तासानंतर यश आले. दरम्यान, दोन ते तीन लोकांना नखाचे घाव देऊन त्याने जखमीही केले. यावेळी गोेकुल चव्हाण या हाताने अपंग असलेल्या युवकाने धाडस करुन मसन्याऊदला कैद केले तर त्याला कैलास चव्हाण, बाळू चव्हाण, वसंत नांंदणे, रामेश्वर कुरवाडे, संजय सोळंके, गोपाल चव्हाण, काशीनाथ चव्हाण यांनी या आॅपरेशन मध्ये मदत केली. यावेळी वर्ल्ड अ‍ॅनीमल, वसा ग्रुप या संघटनेचे शुभम सोळंके व त्याचे सहकारी याठिकाणी प्राणी मित्र म्हणून दाखल झाले होते. वाहतूक पोलीस बोंडे, मंगेश अघडते, हनुमंत सोळंके, अर्जून मुंढे यांनी वाहतूक सुरळीत करण्यासाठी मोलाचे सहकार्य बजावले. (प्रतिनिधी)

Web Title: Four hours after the Massacond prison

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.