५६ कोटींच्या निधीतून पंचवटी ते राजपूत ढाब्यापर्यंतच्या रस्त्याचे चौपदरीकरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 25, 2021 04:12 AM2021-07-25T04:12:11+5:302021-07-25T04:12:11+5:30

अमरावती : तीन वेळा टेंडर रिकॉल झाल्यानंतर अखेर चौथ्यांदा या कामाला कंत्राटदार मिळाला असून निविदा प्रक्रिया पूर्ण झाली आहे. ...

Four lane road from Panchavati to Rajput Dhaba with a fund of Rs. 56 crore | ५६ कोटींच्या निधीतून पंचवटी ते राजपूत ढाब्यापर्यंतच्या रस्त्याचे चौपदरीकरण

५६ कोटींच्या निधीतून पंचवटी ते राजपूत ढाब्यापर्यंतच्या रस्त्याचे चौपदरीकरण

Next

अमरावती : तीन वेळा टेंडर रिकॉल झाल्यानंतर अखेर चौथ्यांदा या कामाला कंत्राटदार मिळाला असून निविदा प्रक्रिया पूर्ण झाली आहे. ५६ कोटींच्या निधीतून आता पंचवटी चौक ते राजपूत ढाबा (रिंगरोड) पर्यंत चाडेचार किमीच्या रस्त्याचे कॉक्रिटिकरण करण्यात येणार असल्याची माहिती सार्वजनिक बांधकाम विभागाने दिली.

५६ कोटींचे काम हे गत दीड ते दोन वर्षांपासून मंजूर होते. मात्र, निविदा प्रक्रियेत काही तांत्रिक त्रुटी आढळल्याने तीनवेळा सदर टेंडर रिकॉल करण्यात आले. त्यानंतर आता ते काम जे.पी. एन्टरप्राईजेस मुंबई या कंपनीला मिळाले आहे. पंचवटी ते राजपूत ढाब्यापर्यंत चारपदरी काँक्रीटीकरणाचा रस्ता, दोन्ही बाजूला सिमेंट नाल्या, तसेच नाली ते सिमेंट रस्त्याच्या मधात पेव्हिंग ब्लॉक, असे ते काम राहणार आहे. या कामाचा बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी व कंपनीच्या इंजिनिअर यांनी सर्वे पूर्ण केला असून, डिझाईन तयार करण्याची प्रक्रिया सुरू आहे. पावसाळ्यामुळे कामात विलंब लागत असून पावसाळ्यानंतर सदर कामांना सुरुवात होईल, असे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.

Web Title: Four lane road from Panchavati to Rajput Dhaba with a fund of Rs. 56 crore

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.