मुंबईमार्गे जाणाºया आणखी चार रेल्वे गाड्या रद्द
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 31, 2017 12:59 AM2017-08-31T00:59:25+5:302017-08-31T00:59:43+5:30
नागपूरहून मुंबईकडे जाणाºया दुरांतो एक्स्प्रेसचे इंजिनसह सहा डबे कसाºयाजवळ रेल्वे रुळावरून मंगळवारी सकाळच्या सुमारास घसरल्याने कल्याण- कसारा मार्गावरील रेल्वे वाहतूक ठप्प झाली.
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : नागपूरहून मुंबईकडे जाणाºया दुरांतो एक्स्प्रेसचे इंजिनसह सहा डबे कसाºयाजवळ रेल्वे रुळावरून मंगळवारी सकाळच्या सुमारास घसरल्याने कल्याण- कसारा मार्गावरील रेल्वे वाहतूक ठप्प झाली. बुधवारी ३० आॅगस्ट रोजी या रेल्वे मार्गावरील वाहतुकीची स्थिती ‘जैसे थे’ होती. त्यामुळे मुंबई- हावडा रेल्वे मार्गावर धावणाºया अनेक गाड्यांना रद्दचा फटका बसला, तर काही गाड्या १४ ते १५ तास उशिरा धावल्यात, अशी माहिती रेल्वे सूत्रांकडून मिळाली आहे.
मुंबईत मुसळधार पाऊस कोसळल्याने मुंबईकरांचे संपूर्ण जनजीवन विस्कळीत झाले. अशातच मंगळवारी दुरांतो एक्स्प्रेसचे सहा डबे रुळावरुन घसरल्याने मुंबईमार्गे जाणाºया गाड्या करण्यात आल्यात. रेल्वे मार्गाच्या दुरुस्तीचे काम युद्धस्तरावर सुरू आहे. मात्र, कसारा नजीक अपघातग्रस्त रेल्वे मार्ग नव्याने उभारावा लागत असल्याने यास बराच विलंब लागणार, असे एका रेल्वे अधिकाºयांनी सांगितले.
रेल्वे वाहतूक रात्री सुरू
अमरावती : रेल्वे मार्ग सुस्थितीत न झाल्याने बुधवारी मुंबईकडे जाणाºया प्रमुख चार गाड्या रद्द करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. गोंदिया- मुंबई विदर्भ एक्सप्रेस, हावडा- मुंबई मेल, हावडा- मुंबई शालीमार एक्स्प्रेस, तर मुंबई- हावडा गितांजली एक्स्प्रेस या दैनंदिन धावणाºया गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. तसेच मुंबई- हावडा सुपर डिलक्स, कुर्ला- हावडा शालीमार एक्स्प्रेस, मुंबई- हावडा मेल १४ ते १५ तास उशिरा धावल्याची माहिती आहे. मात्र भुसावळ- नागपूर यादरम्यान पॅसेंजर गाड्या सुरळीतपणे धावत आहेत. पुणे- हावडा, अहमदाबाद- चैन्नई, भुसावळ- दिल्ली या रेल्वे मार्गावरील वाहतूक सुरळीत आहे. मात्र, मुंबईकडे जाणाºया गाड्या नियोजित वेळेत चालण्यासाठी किमान आठवडाभराचा कालावधी लागेल, असे संकेत रेल्वे सूत्रांनी दिले आहेत. दरम्यान मुंबईकडे जाणारा हा रेल्वे मार्ग बुधवारी उशिरा सुरु करण्यात आला आहे. काही गाड्या दुरुस्त झालेल्या या रेल्वे मार्गावरुन सोडण्यात आल्या आहेत. मुंबईकडे अंबा एक्स्प्रेस उशिरा धावल्याची माहिती आहे.
मुंबईकडे जाणाºया रेल्वे गाड्यांनाच रद्दचा फटका बसला. पर्यायी व्यवस्था नसल्याने प्रवाशांची तारांबळ उडाली. अंबा एक्स्प्रेस सोडण्याचा निर्णय वरिष्ठांनी घेतला असून ती बुधवारी साडेचार तास उशिरा धावली.
- आर.टी.कोटांगळे,
प्रबंधक, रेल्वे स्टेशन अमरावती
अमरावती-मुंबई अंबा एक्स्प्रेस हाऊसफुल्ल
मुंबईकडे जाणाºया अन्य रेल्वे गाड्या रद्द झाल्याने बुधवारी अमरावती-मुंबई अंबा एक्स्प्रेस हाऊसफुल्ल धावली. अंबा एक्स्प्रेस २० डब्यांची आहे. अंबा एक्स्प्रेस बुधवारी सुमारे साडेचार तास उशिरा धावल्याने ती रात्री ११ वाजून ४० मिनिटांनी मुंबईकडे रवाना होणार असल्याची माहिती रेल्वे अधिकाºयांनी दिली.