विना अडसर होणार चार नगरपंचायती

By admin | Published: July 2, 2014 11:08 PM2014-07-02T23:08:47+5:302014-07-02T23:08:47+5:30

राज्यातील १३८ तालुका मुख्यालयी ग्रामपंचायतीऐवजी नगरपंचायती होणार आहेत. यापैकी ७८ नगरपंचायतींसाठी शासनाने अधिसूचना जारी केली. यात जिल्ह्यातील तिवसा, भातकुली, नांदगाव खंडेश्वर

Four Municipal Panchayats to be obstructed | विना अडसर होणार चार नगरपंचायती

विना अडसर होणार चार नगरपंचायती

Next

अमरावती : राज्यातील १३८ तालुका मुख्यालयी ग्रामपंचायतीऐवजी नगरपंचायती होणार आहेत. यापैकी ७८ नगरपंचायतींसाठी शासनाने अधिसूचना जारी केली. यात जिल्ह्यातील तिवसा, भातकुली, नांदगाव खंडेश्वर व धारणी तालुका मुख्यालयाचा समावेश आहे.
शासनाने ३० जून २०१४ पर्यंत याविषयी हरकती व आक्षेप मागविले होते. परंतु यावर आक्षेप आलेच नाहीत. तसेच ग्रामसभा व मासिक सभांचे अहवालदेखील सकारात्मक आल्याने विना अडसर येथे नगरपंचायती होणार आहेत. जिल्ह्यातील तिवसा, भातकुली, नांदगाव खंडेश्वर व धारणी तालुका मुख्यालयी ग्रामपंचायतींची लोकसंख्या २५ हजारांच्या आत असल्याने या ठिकाणी ‘क’ वर्ग नगरपंचायत स्थापनेची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली. १ मार्च २०१४ रोजी राजपत्रात याविषयीची अधिसूचना जारी करून ३० जूनपर्यंत आक्षेप व हरकती मागविल्या होत्या. तसेच स्थानिक ग्रामसभा व ग्रामपंचायतींच्या मासिक सभांचे सकारात्मक अहवालही मागविले होते. हे अहवाल जिल्हा प्रशासनाला प्राप्त झाले आहेत. परंतु चारही तालुक्यांत आक्षेप व हरकती आल्याच नाहीत. त्यामुळे जिल्हास्तरीय सुनावणी होणार नसून याविषयीचे अहवाल याच आठवड्याला नगरविकास प्रशासनाकडे पाठविण्यात येणार आहेत. चारही ठिकाणी आक्षेप नसल्यामुळे येथे विना अडसर नगरपंचायती स्थापित होणार आहेत.

Web Title: Four Municipal Panchayats to be obstructed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.