गुलिस्तानगर गोळीबार प्रकरणात आणखी चार आरोपींना अटक
By admin | Published: January 13, 2015 10:52 PM2015-01-13T22:52:56+5:302015-01-13T22:52:56+5:30
गुलिस्तानगरात सोमवारी सायंकाळी ४ वाजता शेख जफरचा साथीदार आरीफ लेंड्यावर झालेल्या प्राणघातक हल्लात आणखी चार आरोपींना पोलिसांनी मध्यरात्रीतून अटक केली आहे.
अमरावती : गुलिस्तानगरात सोमवारी सायंकाळी ४ वाजता शेख जफरचा साथीदार आरीफ लेंड्यावर झालेल्या प्राणघातक हल्लात आणखी चार आरोपींना पोलिसांनी मध्यरात्रीतून अटक केली आहे. बाबाद्दीन वल्द बद्रोद्दीन (४४,रा.कमेला ग्राऊंड), कलंदररोद्दीन वल्द बद्रोद्दीन (३५,रा.जमील कॉलनी), ऐहफाज अहेमद ऐजाज अहेमद (३५,रा. जाकिर कॉलनी), शेख वसीम उर्फ चायना वल्द शेख मकसुद (२६, रा. हैदरपुरा), अफरोज खान, मोहम्मद इरफान उर्फ अंग्रेज वल्द मोहम्मद युसूफ, अजहर खान उर्फ चायना झुरावर खान असे अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.
जुन्या वैमनस्याहून आरीफ उर्फ लेंड्यावर हा प्राणघातक हल्ला करण्यात आला आहे. यात सोमवारी तीन व मंगळवारी चार आरोपींना अटक करण्यात आली असून सातही जणांना न्यायालयाने १६ जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
शहरात देशी कट्टे येतात कोठून?
गेल्या काही वर्षांत शहरात देशी कट्ट्याने गोळीबार झाल्याचे उघड झाले आहे. मात्र हे देशी कट्टे शहरात कोठून व कसे येतात? याबद्दल अद्यापर्यंत पोलीस विभागाने कसून चौकशी होत नसल्याचे आढळून येत आहे. याबाबत पोलीस उपायुक्त सोमनाथ घार्गे यांच्याशी संवाद साधला असता, ते म्हणाले की हे देशी कट्टे मध्यप्रदेशातून आणल्या जातात. मात्र देशी कट्टे विक्री करणारा व्यक्तीचा अद्यापही पत्ता लागलेला नाही.
१६ जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी
गोळीबार प्रकरणात सात आरोपींना अटक करुन मंगळवारी न्यायालयात हजर करण्यात आले. सातही आरोपींना न्यायालयाने १६ जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. पोलिसांनी घटनास्थळाहून एक रिकामे काडतुस जप्त केले असून देशीकट्टा जप्त करण्याचे प्रयत्न सुरु आहे.