नववर्षाची पहिली रात्र ठरली काळरात्र; दुचाकींची समोरासमोर धडक, ४ ठार, २ जखमी

By गणेश वासनिक | Published: January 2, 2024 03:30 PM2024-01-02T15:30:02+5:302024-01-02T15:30:14+5:30

चांदूरबाजार-अमरावती मार्गावरील घटना

Four people died in a horrific accident where two-wheelers collided head-on in Amravati | नववर्षाची पहिली रात्र ठरली काळरात्र; दुचाकींची समोरासमोर धडक, ४ ठार, २ जखमी

नववर्षाची पहिली रात्र ठरली काळरात्र; दुचाकींची समोरासमोर धडक, ४ ठार, २ जखमी

सुमित हरकुट

चांदूरबाजार (अमरावती): दुचाकींची समोरासमोर धडक होऊन घडलेल्या भीषण अपघातात चौघांचा मृत्यू झाला. तर दोघे गंभीर जखमी झाले. हा अपघात सोमवार, १ जानेवारी रोजी रात्री ९ वाजताच्या सुमारास चांदूरबाजार-अमरावती मार्गावरील एका बारसमोर घडला. नववर्षाची पहिली रात्र त्या चौघांसाठी काळरात्र ठरली.

सौरभ किशोर मसराम (२२) रा. मासोद, अमरावती, शेख जुनेद शेख बिसमिल्ला खान (२१) ताजनगर, चांदूरबाजार, गोलू उर्फ धीरज राजू टवलारे (२०) शेवती, नांदगाव पेठ व शेख नसीम शेख हसन (४०) रा. पिंपळपुरा, चांदूरबाजार अशी मृतकांची नावे आहे. या अपघातात शेख नजीर शेख हसन (५५) रा. ताजनगर, चांदूरबाजार व ओम रवींद्र मसराम (२०) रा. मासोद, अमरावती हे दोघे गंभीर जखमी झाले आहेत. सौरभ मसराम हा दुचाकी क्रमांक एमएच २७ बीजे ४१५४ ने आपल्या दोन सहकाऱ्यांसह बहिरमवरुन अमरावती मार्गाने मासोद येथे जात होता. तर शेख जुनेद शेख बिसमिल्ला खान हे दुचाकी क्रमांक एमएच २७ डीजी ९७०१ ने आपल्या दोन सहकाऱ्यांसह लग्नाच्या स्वागत सभारंभातून अमरावतीवरुन चांदूरबाजारकडे येत होते.

चांदूरबाजारवरुन दोन किलोमिटर अंतरावर असलेल्या एका बारसमोर दोघांच्याही दुचाकींची समोरासमोर जोरदार धडक झाली. या अपघातात सौरभसह त्यांच्या दुचाकीवरील गोलू आणि शेख जुनेदसह त्यांच्या दुचाकीवरील शेख नसीम यांचा जागीच मृत्यू झाला. तर सौरभ यांच्या दुचाकीवरील रवींद्र व शेख जुनेद यांच्या दुचाकीवरील शेख नजीर हे दोघे गंभीर जखमी झाले. अपघाताची माहिती मिळताच चांदूरबाजारचे साहाय्यक पोलीस निरीक्षक निखिल निर्मळ यांनी आपल्या ताफ्यासह घटनास्थळ गाठले. याबाबत माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी अतुल नवगीरे घटनास्थळावर पोहोचले. त्यानंतर नागरिकांच्या मदतीने जखमींना तातडीने जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले.

या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास ठाणेदार सूरज बोंडे यांच्या मार्गदर्शनात साहाय्यक पोलीस निरीक्षक निखिल निर्मळ व प्रमोद राऊत, सारिका राऊत, विनोद इंगळे, दिलीप मुळे, विजय आगळे, प्रशांत निंभोरकर, आशिष इंगळे, गौरव पुसदकर करीत आहेत.

Web Title: Four people died in a horrific accident where two-wheelers collided head-on in Amravati

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.