क्रि के ट सट्टा खेळताना चौघांना अटक 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 2, 2018 11:32 PM2018-02-02T23:32:27+5:302018-02-02T23:33:02+5:30

दक्षिण आफ्रिकेत सुरू असलेल्या एकदिवसीय क्रिकेट सामन्यांवर सट्टा लावणाºया तिघांसह एका बुकीला दत्तापूर पोलिसांनी अटक केली.

Four people were arrested while playing the game | क्रि के ट सट्टा खेळताना चौघांना अटक 

क्रि के ट सट्टा खेळताना चौघांना अटक 

Next
ठळक मुद्देएक लाखाचा मुद्देमाल जप्त : आरोपींना एक दिवसाची पोलीस कोठडी

आॅनलाईन लोकमत
धामणगाव रेल्वे : दक्षिण आफ्रिकेत सुरू असलेल्या एकदिवसीय क्रिकेट सामन्यांवर सट्टा लावणाºया तिघांसह एका बुकीला दत्तापूर पोलिसांनी अटक केली. त्यांच्याजवळून टीव्ही, मोबाइल, मोटार सायकल व रोख दहा हजार रुपये असा एक लाखाहून अधिक रकमेचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. मागील अनेक दिवसांपासून शहरात सट्टा चालत असल्याची चर्चा होती. 
प्राप्त माहितीनुसार, शहरातील मार्केट चौकातील शुभम दीपक जयस्वाल (२३) याच्या घरी क्रिकेटचा सट्टा सुरू असल्याची माहिती दत्तापूर पोलिसांना मिळाली. पोलिसांनी पंचांसह शुभमच्या घरी धाड घातली. यात दहा हजार रुपये रोख मिळाले. येथून शुभम दीपक जयस्वाल (२३ रा. मार्केट चौक) अखिलेश अशोक गावंडे (२८ रा. दत्तापूर) प्रणय प्रमोद कांकरिया (२२ रा. नूतन चौक) व अंकुश सुरेशकुमार बुधलानी (२२) यांना पोलिसांनी ताब्यात घेतले व चौकशीअंती मुंबई जुगार कायद्याचे कलम ४ व ५ सह भादंविच्या सहकलम ४२० अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. आरोपींकडून मोबाइल, टीव्ही, मोटर सायकल असा एक लाखांच्या वर माल जप्त करण्यात आला आहे. कारवाईत स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सदानंद मानकर यांचा सहभाग होता. पोलीस निरीक्षक अशोक लांडे, पोलीस उपनिरीक्षक सचिन कानडे, पोलीस उपनिरीक्षक  अरविंद कुमरे, पोलीस कर्मचारी संजय प्रधान, मंगेश लकडे, विजयसिंह बघेल, किरण दारव्हेकर, गणेश गायकवाड, सचिन गायधने, सचिन अढाऊ , कांचन दाहाट यांनी शिताफीने सापळा रचून सट्टेबाजांना ताब्यात घेतले. 
तालुका न्यायदंडाधिकारी जुही हुशांगाबादे यांनी चौघांना एक दिवसाची पोलीस कोठडी दिली आह. या प्रकरणाचा अधिक तपास दत्तापूर दुय्यम पोलीस निरीक्षक सचिन कानडे करीत आहेत. 
बडे मासे गळाला लागणार 
तपासात तरुण मुलांचीसुद्धा नावे समोर येणार असल्याची माहिती आहे. सध्या याप्रकरणी चौघांना ताब्यात घेतले असले तरी मोठे मासेसुद्धा गळाला लागणार असल्याचे दिसून येत आहे. शैक्षणिक गुणवत्तेत अग्रेसर असलेल्या शहरालासुद्धा क्रिकेटच्या सट्टाबाजाराचे स्वरूप आले असल्याचे घडलेल्या घटनेने स्पष्ट झाले आहे.
 

Web Title: Four people were arrested while playing the game

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.