विधानसभेला चार हजार पोलिसांचा बंदोबस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 19, 2019 06:00 AM2019-09-19T06:00:00+5:302019-09-19T06:00:57+5:30

जिल्हा ग्रामीण पोलिसांच्या कार्यक्षेत्रात एकूण १२५७ इमारती व १९२४ बूथ राहणार आहे. यामध्ये बडनेरा विधानसभा मतदारसंघातील चार बूथचा समावेश आहे. याव्यतिरिक्त अमरावती विधानसभा व बडनेरा मतदारसंघातील उर्वरित बूथ हे पोलीस आयुक्तालयाच्या कक्षेत येत असल्याने त्यांच्यासाठी स्वतंत्र नियोजन तयार करण्यात आलेले आहे.

Four thousand policemen arranged for assembly | विधानसभेला चार हजार पोलिसांचा बंदोबस्त

विधानसभेला चार हजार पोलिसांचा बंदोबस्त

Next
ठळक मुद्देपोलीस अधीक्षकांचे कार्यक्षेत्र : जिल्ह्यात १२१७ इमारतींमध्ये १९२७ बूथ

गजानन मोहोड ।
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : विधानसभा निवडणुकांच्या अनुषंगाने जिल्हा निवडणूक विभागाप्रमाणे पोलीस विभागाच्या हालचालीही गतिमान झाल्या आहेत. कार्यक्षेत्राकरिता प्रस्तावित नियोजन जिल्हा पोलीस अधीक्षक हरी बालाजी एन यांनी तयार केले आहे. यानुसार ग्रामीण पोलिसांच्या कार्यक्षेत्रात किमान चार हजार पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांचा बंदोबस्त राहणार आहे.
जिल्हा ग्रामीण पोलिसांच्या कार्यक्षेत्रात एकूण १२५७ इमारती व १९२४ बूथ राहणार आहे. यामध्ये बडनेरा विधानसभा मतदारसंघातील चार बूथचा समावेश आहे. याव्यतिरिक्त अमरावती विधानसभा व बडनेरा मतदारसंघातील उर्वरित बूथ हे पोलीस आयुक्तालयाच्या कक्षेत येत असल्याने त्यांच्यासाठी स्वतंत्र नियोजन तयार करण्यात आलेले आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयाने दिलेल्या माहितीनुसार, ग्रामीण पोलिसांच्या कक्षेतील १०२ निवडणूक बूथ हे संवेदनशील, ५ क्रिटिकल अशी नोंद आहे. याव्यतिरिक्त १७० झोन राहणार आहेत. सेक्टर पेट्रोलिंग ७६, आंतरराज्य सीमा नाका ८, आंतरजिल्हा सीमा नाका १०, शॅडो एरिया (अतिदुर्गम भाग) ३४, तर स्ट्राँग रूम ६ राहणार आहेत. राजकीयदृष्ट्या संवेदनशील २८, कम्यूनल संवेदनशील ४६ व गुन्हे नोंद असलेले २८ बूथ जिल्हा ग्रामीणमध्ये आहेत.
विधानसभा निवडणुकीत कायदा व सुवव्यवस्थेच्या अनुषंगाने आयोगाने वेळोवेळी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे जिल्हा पोलीस अधीक्षक व पोलीस आयुक्तांशी संवाद साधला आहे. जिल्ह्यात निवडणुकीच्या दृष्टीने तयारीसाठी बुधवारी मुख्य निवडणूक आयुक्त मुंबईला आले. त्यांनी जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षकांची बैठक घेतली. त्यानंतर गुरुवारी किंवा शुक्रवारी आयोगाद्वारे राज्य विधानसभेच्या निवडणुकीची घोषणा होणे अपेक्षित आहे.

निवडणूक काळात गुन्ह्यांची स्थिती
सन २०१४ मध्ये झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीत जिल्हा ग्रामीण पोलीस क्षेत्रात एकूण ४३ गुन्ह्यांची नोंद झाली होती. यापैकी २० प्रकरणे अद्यापही न्यायप्रविष्ट आहेत. एकूण गुन्ह्यांमधील १५ प्रकरणांत निर्दोष मुक्तता झाली आहे, तर दोन प्रकरणांत अंतिम पाठविण्यात आले आहेत. तीन प्रकरणांत आरोपींना शिक्षा ठोठावली, तर तीन प्रकरणे खारीज झालेली आहेत. तपासात प्रलंबित असलेले एकही प्रकरण नाही. लोकसभा २०१९ मध्ये आचारसंहिता उल्लंघनाच्या एकूण १९ गुन्ह्यांची नोंद आहे. यापैकी सहा गुन्हे दाखल झाले, पाच न्याप्रविष्ट आहेत. एका प्रकरणात आरोपीचा मृत्यू झाल्याचे शपथपत्र न्यायालयात दाखल करण्यात आले असल्याची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयाने दिली.

असे राहणार मनुष्यबळ
जिल्हा ग्रामीण पोलिसांच्या कार्यक्षेत्रात एक एसपी, दोन डीवायाएसपी, २५ पोलीस निरीक्षक, १९० सहायक पोलीस निरीक्षक व पोलीस उपनिरीक्षक, २,९३१ पोलीस शिपाई, ८०० होमगार्ड व ७ कंपनी गार्ड असे प्रस्तावित मनुष्यबळ अपेक्षित आहे.

Web Title: Four thousand policemen arranged for assembly

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.