एकेरी वळण रस्त्यावर चारचाकीला अपघात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 16, 2020 04:30 AM2020-12-16T04:30:29+5:302020-12-16T04:30:29+5:30
बाहेरच्या पानासाठी फोटो पी १५ वरूड वरुड /पुसला : वरुड अमरावती राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ३५३ के या मार्गावरील एकेरी ...
बाहेरच्या पानासाठी
फोटो पी १५ वरूड
वरुड /पुसला : वरुड अमरावती राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ३५३ के या मार्गावरील एकेरी वळण रस्त्यावर मंगळवारी कार अपघातग्रस्त झाली. यात दाम्पत्यासह त्यांचा मुलगा असे तिघे गंभीर जखमी झाले.
छिंदवाडा येथील जायस्वाल परिवार आर्वीकडे जात असताना याच वळण रस्त्यावर समोरून एक ट्रक आल्याने कार अनियंत्रित होऊन चालकाचे संतुलन बिघडले आणि कार रस्त्याच्या कडेला झाडावर आदळली. यात कारचालक सौरभ जयस्वाल (४५), पत्नी परमित जयस्वाल (३२) आणि मुलगा रियान (६) हे जखमी झाले. त्यांची एमपी २८ सीए ५४०२ ही कार चकनाचूर झाली. उपस्थित नागरिकांनी जखमींना खासगी रुग्णालयात हलविले. दुपारी १.३० च्या सुमारास अपघात झाला.
रस्त्याच्या दर्जाबाबत असंतोष
पुसला वनविभाग काष्ठ आगारापासून तर रेल्वे क्रॉसिंगलगत एक ते सव्वा किमी लांबीचा एकेरी सिमेंट रस्ता बांधण्यात आला. रस्त्याच्या कडा उघड्या आहेत. यामुळे एकमेकांसमोर वाहने आलीत की असंतुलित होऊन अपघात घडतात. एकेरी सिमेंट रोड अपघातास कारणीभूत ठरत आहे. १२ डिसेंबर रोजी सकाळी ११ वाजताच दरम्यान शेतकरी बैलबंडीसह घरी परत जात असताना मागून येणाऱ्या एका कारने धडक दिली. यात बैलबंडीचा चुराडा झाला होता.