रेल्वे स्टेशन मार्गावर चारचाकी पेटली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 11, 2019 11:13 PM2019-02-11T23:13:55+5:302019-02-11T23:14:18+5:30
इर्विन ते रेल्वे स्टेशन मार्गावर हॉटेलसमोर उभे असलेल्या चारचाकी वाहनाला (जीप) आग लागली. शनिवारी मध्यरात्री १२.१५ च्या सुमारास आकस्मिक लागलेल्या आगीत ते वाहन खाक झाले. अग्निशमनच्या पथकाने आग विझविली. मात्र, तोपर्यंत बराच उशीर झाला होता. या आगीबाबत संशय व्यक्त केला जात आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : इर्विन ते रेल्वे स्टेशन मार्गावर हॉटेलसमोर उभे असलेल्या चारचाकी वाहनाला (जीप) आग लागली. शनिवारी मध्यरात्री १२.१५ च्या सुमारास आकस्मिक लागलेल्या आगीत ते वाहन खाक झाले. अग्निशमनच्या पथकाने आग विझविली. मात्र, तोपर्यंत बराच उशीर झाला होता. या आगीबाबत संशय व्यक्त केला जात आहे.
रस्त्याच्या कडेला एमएच २९ एआर ६०७७ या वाहनातून अचानक धूर निघू लागला. उपस्थितांच्या लक्षात येण्यापूर्वीच त्या वाहनाने पेट घेतला. लगेच अग्निशमन विभागास वर्दी देण्यात आली. एका बंबाच्या सहाय्याने आगीवर नियंत्रण मिळविण्यात आले. यवतमाळचे भाऊराव जाधव नामक व्यक्तीच्या मालकीचे ते वाहन असल्याची प्राथमिक माहिती पोलिसांनी दिली. वाहनांना आकस्मिक आग लागून ते जळाल्याच्या अलीकडच्या काही घटना पाहता संशय व्यक्त केला जात आहे. तीन दिवसांपूर्वी विलासनगर भागात कापसाने भरलेल्या ट्रकला आग लागली होती. त्यापूर्वी विभागीय आयुक्तालय परिससरातील तीन ट्रॅव्हल्स आगीच्या भक्ष्यस्थानी सापडल्या होत्या.