चार महिला नगरसेवक मिनी महापौर
By admin | Published: April 8, 2016 12:11 AM2016-04-08T00:11:59+5:302016-04-08T00:11:59+5:30
अवघ्या ७ -८ महिन्यांवर येऊन ठेपलेल्या महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या तोंडावर चार महिला नगरसेवकांना मिनीमहापौर पदाचा मान देण्यात आला.
बेरजेचे राजकारण : अजय गोंडाणेंना संधी
अमरावती : अवघ्या ७ -८ महिन्यांवर येऊन ठेपलेल्या महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या तोंडावर चार महिला नगरसेवकांना मिनीमहापौर पदाचा मान देण्यात आला.
याशिवाय बसपाचे अजय गोंडाणे यांनाही सत्तेत सामावून घेण्यात आले. पाचही झोन सभापतीपदी अविरोध निवड झाली. काँगे्रसच्या अर्चना इंगोले झोन क्र. १ च्या झोन सभापती म्हणून अविरोध निवडून आल्या. राष्ट्रवादी काँग्रेस फ्रंट मधून बिल्कीस बानो झोन क्र. २ च्या सभापतीपदाचा पदभार स्वीकारतील. याशिवाय झोन क्र. ३ चे सभापती म्हणून बसपाचे अजय गोंडाणे, झोन क्र.४ च्या सभापती म्हणून जनविकासच्या अंजली पांडे व झोनच्या ५ च्या सभापती म्हणून कॉँग्रेसच्या तमीजा बी यांच्यावर जबाबदारी सोपविण्यात आली. विशेष म्हणजे राकांच्या गटनेत्यांनी बेरजेचे राजकारण करून अजय गोंडाणे आणि जनविकास कॉँग्रेसला दिलेला शब्द पाळला.
गुरुवारी सकाळी ११ वाजता स्व. सुदामकाका देशमुख सभागृहात जिल्हाधिकारी किरण गित्ते यांच्या अध्यक्षतेखाली झोन सभापतींच्या निवडीवर औपचारिक शिक्कामोर्तब करण्यात आले. नव्या मिनी महापौरांचे सर्वपक्षीय पदाधिकाऱ्यांनी स्वागत केले. (प्रतिनिधी)