चतुर्थश्रेणी कर्मचाºयांचा संप, कामकाज प्रभावित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 22, 2017 11:58 PM2017-09-22T23:58:40+5:302017-09-22T23:58:50+5:30
राज्य सरकारी चतुर्थ श्रेणी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेद्वारा शासन व प्रशासन स्तरावर प्रलंबित मागण्यांसाठी कर्मचाºयांनी दोन दिवसीय संप पुकारला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : राज्य सरकारी चतुर्थ श्रेणी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेद्वारा शासन व प्रशासन स्तरावर प्रलंबित मागण्यांसाठी कर्मचाºयांनी दोन दिवसीय संप पुकारला आहे. संपाच्या शुक्रवारी कर्मचाºयांनी राज्य शासनाच्या विविध कार्यालयासमोर ठिय्या दिला.
चतुर्थश्रेणी कर्मचाºयांच्या प्रमुख मागण्यांमध्ये अनुकंपा तत्वावरील शासकीय चतुर्थश्रेणी कर्मचाºयांच्या पाल्यास विनाअट सेवेत सामावून घ्यावे, सेवानिवृत्त व वैद्यकीय कारणास्तव शासकीय सेवा करण्यास अपात्र ठरलेल्या कर्मचाºयांचे पाल्यास किंवा कुटुंबातील एका व्यक्तीस विनाअट शासकीय सेवेत सामावून घ्यावे, धुलाई भत्त्याच्या दरात ५०० रुपयांची वाढ करण्यात यावी, लेखा कोषागार व बँकेचे काम करणाºया संदेश वाहकाला एक हजार रुपये विशेष भत्ता लागू करण्यात यावा, कर्मचारी शासकीय कामानिमित्त मंत्रालय येथे गेले असल्यास त्यांच्या राहण्यासाठी विश्रामगृहात एक कक्ष आरक्षित ठेवावा, यासह अन्य मागण्यासाठी कर्मचाºयांनी हा संप पुकारला आहे. संपात मोठया संख्येने राज्यशासकीय चतुर्थश्रेणी कर्मचारी सहभागी झाले होते.