खुशबू अव्वल, निकाल ८९.९५ टक्के

By Admin | Published: May 31, 2017 12:19 AM2017-05-31T00:19:03+5:302017-05-31T00:19:03+5:30

फेब्रुवारी, मार्च-२०१७ मध्ये घेण्यात आलेल्या उच्च माध्यमिक शालांत परीक्षेचा निकाल मंगळवारी दुपारी १ वाजता आॅनलाईन जाहीर झाला.

Fragrance tops, resulted in 8.99 percent | खुशबू अव्वल, निकाल ८९.९५ टक्के

खुशबू अव्वल, निकाल ८९.९५ टक्के

googlenewsNext

जिल्ह्यात मुलींचीच झेप : बियाणीची यंदाही मुसंडी, धारणी तालुका प्रथम, तिवसा ढांग
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : फेब्रुवारी, मार्च-२०१७ मध्ये घेण्यात आलेल्या उच्च माध्यमिक शालांत परीक्षेचा निकाल मंगळवारी दुपारी १ वाजता आॅनलाईन जाहीर झाला. या परीक्षेत स्थानिक ब्रजलाल बियाणी विज्ञान महाविद्यालयाची विद्यार्थिनी खुशबू अजयकुमार हेडा हिने ६५० पैकी ६३१ गुणांसह ९७.०८ टक्केवारी मिळवून जिल्ह्यासह विभागातही प्रथम क्रमांक पटकाविला. द्वितीय क्रमांक स्थानिक श्री शिवाजी विज्ञान महाविद्यालयाची विद्यार्थिनी शर्वरी संदीप देशपांडे हिने पटकावला. तिला ६२७ गुण मिळालेत. तिच्या निकालाची टक्केवारी ९६.४३ इतकी आहे. तृतीय क्रमांकाची मानकरी देखील श्री शिवाजी विज्ञान महाविद्यालयाची विद्यार्थिनी स्नेहा पांढरीकर ठरली. तिने ९५.६९ टक्के गुण मिळविलेत.
जिल्ह्यातून प्रथम येण्याचा सन्मान यंदा सुद्धा श्री ब्रजलाल बियाणी विज्ञान महाविद्यालयाला मिळाला असला तरी यंदाच्या निकालात श्री शिवाजी विज्ञान महाविद्यालयाने मुसंडी मारल्याचे चित्र आहे. शिवाजी विज्ञान महाविद्यालयाचा निकाल एकूण ९९.५९ टक्के लागला आहे. तर विद्याभारती विज्ञान महाविद्यालयाची निकालाची टक्केवारी ९८.६६ इतकी तर मणिबाई गुजराती हायस्कूल विज्ञान शाखेची एकूण टक्केवारी ९७.३३ इतकी आहे, केशरबाई लाहोटी वाणिज्य महाविद्यालयाचा निकाल ९७.२६ टक्के लागला आहे. गणेशदास राठी वाणिज्य महाविद्यालय ९८.७० टक्के, रूरल इनिस्टट्यूटचा निकाल ९७.८२ टक्के लागला आहे. विदर्भ विज्ञान महाविद्यालयाचा निकाल ९३.५० टक्के लागला आहे. निकालावर यंदाही मुलींचाच वरचष्मा दिसून आला.

‘केशरबाई’ची वैष्णवी वाणिज्य शाखेतून प्रथम
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : उच्च माध्यमिक शालांत परीक्षेत वाणिज्य शाखेतून स्थानिक केशरबाई लाहोटी महाविद्यालयाची विद्यार्थिनी वैष्णवी संजय वैद्य हिने जिल्ह्यातून प्रथम क्रमांक पटकावला.
वैष्णवीला ९६.७६ टक्के गुण मिळालेत. वैष्णवीला तिच्या यशाचे गमक विचारले असता तिने नियमित व एकाग्र अभ्यास केल्याचे सांगितले. सेल्फ स्टडीवर भर दिल्याचे सांगताना वैष्णवी म्हणाली, अभ्यासाचे टेन्शन घेऊ नये. जसा वेळ मिळेल तसा अभ्यास करावा. प्रयत्न केल्यास यश मिळतेच. मात्र, महाविद्यालयात आणि क्लासमध्ये सुद्धा शिक्षक शिकवित असताना एकाग्रचित्ताने लक्ष दिल्यास त्याचा परीक्षेत उपयोग होतोच. वैष्णवीला सीए व्हायचे आहे. त्यासाठीच तिने दहावीत ९४.२० टक्के गुण मिळवून देखील विज्ञान ऐवजी वाणिज्य शाखा निवडली. ती तिच्या यशाचे श्रेय आई-वडिल व मोठ्या बहिणीला देते.

गतवर्षी २७ मुलांनी ९० टक्यांपेक्षा अधिक गुण मिळविले होते.यंदा त्यात ८ ने भर पडली आहे. श्री.शिवाजी विज्ञान महाविद्यालयाने यशाची परंपरा कायम राखली. त्याचे श्रेय पालक, विद्यार्थी आणि आमच्या अनुभवी प्राध्यापकांमधील समन्वयाला आहे.
विजय ठाकरे, प्राचार्य, श्री. शिवाजी विज्ञान महाविद्यालय

Web Title: Fragrance tops, resulted in 8.99 percent

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.