बनावटी बियाण्यांमुळे उत्पादकांची फसगत
By admin | Published: November 5, 2015 12:28 AM2015-11-05T00:28:28+5:302015-11-05T00:28:28+5:30
संत्रा उत्पाकांवर दरवर्षीप्रमाणे चिंतेचे सावट असल्याने नगदी पीक म्हणून मिरची उत्पादकांनी मिरचीचे उत्पादन घेणे सुरु केले.
राजुऱ्याचा मिरची बाजार ओस : आवक नसल्याने व्यापारी हवालदिल
संजय खासबागे वरुड
संत्रा उत्पाकांवर दरवर्षीप्रमाणे चिंतेचे सावट असल्याने नगदी पीक म्हणून मिरची उत्पादकांनी मिरचीचे उत्पादन घेणे सुरु केले. तालुक्यात मिरची पिकाचे मोठ्या प्र्रमाणात उत्पादन घेतले जात असून यावषी मिरचीचे बनावटी बियाण्यामुळे आवक घटली तर मिरची उत्पादकांना फटका बसल्याने उत्पादनात घट झाली.
एक हजार ते २ हजार ३०० रुपये प्रतिक्विंटल भाव मिळत आहे. पंरतू आवक नसल्याने व्यापारी आणि मिरची उत्पादक शेतकरी हवालदिल झाले आहे. १०० ते १५० क्विंटल मिरची बाजारात येत असते. शेकडो हातांना काम देणारी बाजारपेठेत एरवी गदीर् दिसत होती परंतु आता शुकशुकाट दिसून येतो. मिरचीचे नकली बियाण्याची विक्री करणाऱ्यावर कठोर कारवाईची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.
वरुड तालुक्यात संत्र्याचे मोठया प्रमाणात उत्पादन घेतल्या जाते. परंंतु गत काही वर्षांपासून निसर्गाच्या लहरीपणामुळे संत्रा पिकात सुध्दा घट झाली आहे. यामुळे शेतकऱ्यांनी आता मिरचीकडे आगेकूच करीत मिरचीचे मोठया प्रमाणावर उत्पादन घेतल्या जाते. शेकडो क्विंटल मिरची राजूरा बाजारच मिरची बाजार येथे येते. कच्चा माल असल्याने परत नेणे शेतकऱ्यांना शक्य होत नाही. यामुळे ेमिळेल त्या भावात विकून मोकळ ेव्हावे लागते. रात्रीतून मिरची देवाणघेवाण करणारी राजूराबाजारची बाजारपेठ प्रसिध्द आहे. परंतु परप्रांतीय बाजारपेठेत सुध्दा चांगली मागणी असते. येथून कोलकाता, मुंबई, दिल्ली, जबलपूर, नागपूर, हैद्राबाद सह राजस्थान, गुजरात, महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्रप्रदेश, मध्यप्रदेश छत्तिसगड, पंजाब, उत्तरप्रदेश, पश्चिम बंगाल, सह देशाच्या कानाकोपऱ्यात येथून मिरची पाठविल्या जाते. एवढेच नव्हे तर पाकीस्तान, बांग्लादेश , दुबई , सौदी अरब राष्ट्रासह आदी देशात येथील मिरचीला अधिक मागणी असल्याने निर्यात केल्या जाते. कृषी उत्पन्न बाजार समितीचा उपबाजार असलेल्या राजुराबाजार मिरची बाजारात परवानाधारक १८९ व्यापारी, ५६ अडते, दोन मापारी, ९३ हमाल आणि एक वखारीवाला आहे. तर ५०० ते ६०० मजूरांच्या हाताला काम मिळते. तर बाजार सिमतीला सुध्दा सुरुवातीच्या काळात तीन ते चार हजार रुपये सेस मिळतो हंगामामध्य ेहा सेस २० ते २५ हजार रुपयापर्यंत उत्पन्न मिळवून देत असल्याचे सांगण्यात येते. वाहतूकदारांना सुध्दा चांगली संधी मिळते. परंतु यंदा मिरची उत्पादकांची फसगत झाल्याने राजुऱ्याचा मिरचीबाजार ओस पडला आहे.