फ्रेजरपुरा पोलिसांची भाजीपाला विक्रेत्यांवर कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 3, 2021 04:10 AM2021-06-03T04:10:27+5:302021-06-03T04:10:27+5:30

व्यंकय्यापुऱ्यात भाजीविक्रेत्याविरुद्ध कारवाई अमरावती : व्यंकय्यापुरा येथे भाजीविक्रेता मंगेश सुधाकरराव सातपुते (३३, रा. व्यंकय्यापुरा) त्याच्याविरुद्ध संचारबंदीचे उल्लंघन केल्याबद्दल विविध ...

Frazerpura police cracks down on vegetable sellers | फ्रेजरपुरा पोलिसांची भाजीपाला विक्रेत्यांवर कारवाई

फ्रेजरपुरा पोलिसांची भाजीपाला विक्रेत्यांवर कारवाई

Next

व्यंकय्यापुऱ्यात भाजीविक्रेत्याविरुद्ध कारवाई

अमरावती : व्यंकय्यापुरा येथे भाजीविक्रेता मंगेश सुधाकरराव सातपुते (३३, रा. व्यंकय्यापुरा) त्याच्याविरुद्ध संचारबंदीचे उल्लंघन केल्याबद्दल विविध कलमान्वये गुन्हे नोंदविण्यात आले. ३१ मे रोजी पोलिसांनी ही कारवाई केली.

कुमारवाडा येथे तिघांविरुद्ध गुन्हा

अमरावती : फ्रेजरपुरा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कुंभार वाडा येथे संचारबंदीचे उल्लंघन करणाऱ्या तिघांविरुद्ध पोलिसांनी कारवाई केली. सहदेव सुखदेव बोदिले (३४) व विशाल सदाशिव गजघाटे (३५, दोघेही रा. भीमज्योत मंडळ सलमान रहमान चौधरी (२८, रा. कुंभारवाडा) अशी आरोपींची नावे आहेत. ३१ मे रोजी कारवाई करण्यात आली.

टोल नाका येथे दोघांविरुद्ध कारवाई

अमरावती : नांदगाव पेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील टोल नाका येथे ३१ मे रोजी संचारबंदीचे उल्लंघन केल्याप्रकरणी विनोद रामदास वृंदावणे (३२, रा. शेवती जहागीर) व स्वप्निल सुरेश कोहळे (३२, रा. आष्टी जिल्हा वर्धा) यांच्याविरुद्ध भादंवि कलम १८८ अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला. तोंडाला मास न लावता का कारण बाहेर पडल्याने ही कारवाई करण्यात आली.

अपार्टमेंटमध्ये अश्लील शिवीगाळ

अमरावती : गाडगेनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील विठ्ठलनगर येथे अतुल पुरुषोत्तम हंबर्डे (३५) हा मद्यपान करून इतर रहिवाशांना अश्लील शिवीगाळ करीत असल्याची तक्रार नंदकुमार जावरकर (४०) यांनी नोंदविली. अतुलने पाळलेली तीन ते चार कुत्री परिसरात घाण करीत असल्याचेही तक्रारीत नमूद आहे. पोलिसांनी याप्रकरणी ३१ मे रोजी भादंविचे कलम २९४, २००, ९१ अन्वये गुन्हा नोंदविला.

चांदूरबाजार फाट्यावर दोघांविरुद्ध गुन्हा

अमरावती : वलगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीतील चांदूरबाजार फाटा येथे तोंडाला मास्क न लावता विनाकारण फिरत असलेले राजू गोवर्धन माकोडे (३२, रा. बाजारपूर वलगाव) व प्रेमनाथ ओमकार झटाले (४२, रा. आडगाव तालुका नांदगाव खंडेश्वर) विरुद्ध भादंवि कलम १८८ अन्वये गुन्हे नोंदविण्यात आले. ३१ मे रोजी ही कारवाई करण्यात आली.

बडनेरा मार्गावर तिघांविरुद्ध गुन्हा

अमरावती : संचारबंदी आदेश मोडल्याप्रकरणी बडनेरा मार्गावरील व्हाईट कॅसल लोन येथे अभिजित रमेश राऊत (२४, रा. रामासौर) सागर अशोक देशमुख (२९) आशिष अशोक जोशी (३०, दोघेही रा. कळमेश्वर नागपूर) यांच्याविरुद्ध भादंविच्या कलम १८८ अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला. मास्क न लावता ते विनाकारण फिरताना राजापेठ पोलिसांना आढळले.

गोपाल नगर येथे तिघांविरुद्ध पुन्हा

अमरावती : राजापेठ ठाण्याच्या हद्दीतील गोपालनगर येथे आकाश रामभाऊ शिरभाते (२८), प्रदीप नत्थुजी नांदुरकर (३५, दोघे रा. गोपालनगर) अनिल पुंडलिकराव वायकर (रा. ज्योती कॉलनी) यांच्याविरुद्ध भादंविचे कलम १८८ अन्वये कारवाई करण्यात आली. ३१ मे रोजी ही घटना घडली.

हिंदू स्मशानभूमी आंदोलकांविरुद्ध गुन्हा

अमरावती : काली माता मंदिर परिसरातील हिंदूस्मशानभूमी येथे तिसरी विद्युत शवदाहिनी लावण्याच्या समर्थनार्थ एकत्र आलेल्याविरुद्ध राजापेठ पोलिसांनी भादंवि कलम १८८, १३५ राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन कायदा ५१ ब २, ३ ४ साथ रोग अधिनियम अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला. ज्ञानेश्वर धाने पाटील, दिनेश बुब, पराग गुडधे, राजेंद्र तायडे, संजय शेटे, पंजाबराव तायवाडे, अक्षय चऱ्हाटे, श्याम खाते, मयूर गव्हाणे अधिक चार ते पाच जणांचा यात समावेश आहे. ३१ मे रोजी ही कारवाई करण्यात आली.

मसान गंज येथे जुगार याला अटक

अमरावती : सांगली येथील स्वीपर कॉलनीतील मंगल कार्यालयानजीक जुगाराची सट्टापट्टी देत असलेला राज अर्जुन बगन (२८, रा. मसानगंज नंबर २ शाळेजवळ) याच्याकडून ४३५ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. नागपुरी गेट पोलिसांनी ३१ मे रोजी ही कारवाई केली.

परिहार पूर यात गावठी दारू जप्त

अमरावती : वडाळी परिसरातील परिहारपुऱ्यात ३० वर्षीय महिलेच्या घरापुढे लावलेली दारूची हातभट्टी पोलिसांनी उद्ध्वस्त करून ३० लिटर मोहा माच, १५ लिटर दारूसह १४६५० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. याप्रकरणी महिलेविरुद्ध दारूबंदी कायद्यान्वये गुन्हा नोंदविण्यात आला. ३१ मे रोजी ही कारवाई करण्यात आली.

संचारबंदीचे उल्लंघन, दोघांविरुद्ध गुन्हा

अमरावती : संचारबंदीचे उल्लंघन करून विनामास्क फिरणाऱ्या दोघांविरुद्ध राजापेठ व भातकुली पोलिसांनी कारवाई केली. श्याम राजेंद्र मांडवगणे (२६, रा. गोपालनगर व कालू अयाज खान (२२, रा. भातकुली) अशी त्यांची नावे आहेत. अनुक्रमे ३१ मे व १ जून रोजी कारवाई करण्यात आली.

महादेव खोरी ते देशी दारू विक्री

अमरावती : फ्रेजरपुरा पोलीस ठाण्याच्या हद्दीत महादेव खोरी येथे मोहन सहदेवराव रामटेके (४६) हा देशी दारूची विक्री करीत होता. फ्रेजरपुरा पोलिसांनी ३१ मे रोजी त्याच्याकडून ५२० रुपयांचा मुद्देमाल जप्त करून गुन्हा नोंदविला.

खारतळेगाव येथे चारचाकी वाहनातून मध्य जप्त

अमरावती : चारचाकी वाहनातून देशी दारूची वाहतूक होत असल्याच्या माहितीवरून वलगाव पोलिसांनी कारवाई करीत ३३,६०० रुपयांचा मुद्देमाल ३१ मे च्या रात्री जप्त केला. याप्रकरणी ऋषी रामदास काटोले (१९, रा. नारायणनगर चांदूरबाजार) उज्ज्वल दिलीप बोराडे (१९, रा. सोनोरी ता. चांदूरबाजार), अक्षय रोशन स्थूल (२१, रा. सिद्धार्थनगर चांदूरबाजार) यांच्याविरुद्ध दारूबंदी कायद्यान्वये १ जून रोजी गुन्हा नोंद घेण्यात आला. त्यांच्याकडून ५० हजारांची चारचाकीदेखील पोलिसांनी जप्त केली.

झाडपीपुरा येथून मोबाइल लंपास

अमरावती : नागपुरी गेट पोलीस ठाण्याच्या हद्दीतील झेडपीपुरा येथे दर्शन मनोज गुप्ता (२१) या युवकाच्या खिशातील ३० हजारांचा मोबाईल अज्ञात चोरट्याने ३१ मे च्या रात्री चोरून नेला. तो व त्याचे काही सहकारी अंगणात झोपले होते. त्यावेळी ही घटना घडली. नागपुरी गेट पोलिसांनी भादंविच्या कलम ३७९ अन्वये गुन्हा नोंदविला.

तेल भांडार संचालकांविरुद्ध गुन्हा

अमरावती : चपराशीपुरा येथे ओम तेल भांडारचा संचालक रवि भागचंद्र साहू (४५) विरुद्ध भादंविचे कलम १८८ व साथरोग अधिनियम अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला. मास्क न लावता साहित्याची विक्री केल्याप्रकरणी ही कारवाई १ जून रोजी फ्रेजरपुरा पोलिसांनी केली.

गांधीनगर येथे देशी दारू जप्त

अमरावती : फ्रेजरपुरा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बनोडा बगीच्याजवळ संघपाल संजय बर्डे (२६, रा. संजय गांधीनगर) याच्याकडून देशी दारूच्या २४ पावट्या जप्त करण्यात आल्या. १ जून रोजी ही कारवाई करण्यात आली. त्याच्याविरुद्ध भादंविचे कलम १८८ सह विविध कलमान्वये गुन्हा नोंदविण्यात आला.

मेरे देश का पुरा एरिया मेरा है

अमरावती : संचारबंदीच्या कालावधीत अकारण बाहेर पडल्याबद्दल जाब विचारताच मैने वकील को फोन लगाया. मेरे देश का पुरा एरिया मेरा है, असे म्हणत, एकाने पोलिसांशी हुज्जत घातली.

पवन अशोक गुप्ता (४२, रा. मणिपूर कॉलनी) असे शासकीय कामात अडथळा आणणाऱ्या व्यक्तीचे नाव आहे. त्याच्यासह आणखी दोघेजण नगर येथे थांबले होते. पोलिसांचे वाहन पाहताच दोघे पळून गेले, तर पवनने असभ्य वर्तन केले. ३१ मे रोजी दुपारी १ वाजतानंतर हा प्रकार घडला. याप्रकरणी गाडगेनगर पोलिसांनी भादंविच्या कलम १८६, १८८, २६९, २७०, २७१, २९१, २, ३, ४ साथीचे रोग अधिनियम ५१ ब आपत्ती व्यवस्थापन कायद्यान्वये गुन्हा नोंदविला. त्याला समजपत्रावर सोडण्यात आले.

संचार बंदीचे उल्लंघन दोघांविरुद्ध गुन्हा

अमरावती : तोंडाला मास्क न लावता घराबाहेर पडणारे कैलास प्रल्हाद परोपकार (४१, रा. प्रवीणनगर व अब्दुल शाहिद अब्दुल कदीर (३५, रा. सतीनगर वडगाव) यांच्याविरुद्ध अनुक्रमे गाडगेनगर व वलगाव पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला. ३१ व १ जून रोजी ही घटना घडली.

डेअरी संचालकांविरुद्ध गुन्हा

अमरावती : गाडगेनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत संमती कॉलनी येथे मदर डेअरी चालविणारे राजकुमार भाऊराव चौधरी (५६) यांनी निर्धारित वेळेनंतर प्रतिष्ठान सुरू ठेवले ३१ मे रोजी गाडगेनगर पोलिसांनी त्यांच्याविरुद्ध गुन्हा नोंदविला.

गाडगेनगर पोलिसांची आंबे विक्रेत्या विरुद्ध कारवाई

अमरावती : संचारबंदीच्या कालावधीत निर्धारित वेळेनंतर आंबे विक्री करताना आढळलेले सुभाष प्रल्हाद देशमुख (६१, रा. प्रवीणनगर) मोहम्मद समीर मोहम्मद हारूण (१९, रा. असिर कॉलनी व चाळीस वर्षे महिला राहणार चांदूरबाजार यांच्याविरुद्ध गुन्हे नोंदविण्यात आले. नगर पोलिसांनी ३१ मे रोजी ही कारवाई केली.

नारळ पाणी विक्रेता विरुद्ध गुन्हा

अमरावती : गाडगेनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील राठीनगर येथे निर्धारित वेळेनंतर नारळ पाणी विक्री करणारे नारायण महादेव साबळे (५४, रा. कोणार्क कॉलनी) याच्याविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हे नोंदविण्यात आले. ३१ मे रोजी ही कारवाई करण्यात आली.

Web Title: Frazerpura police cracks down on vegetable sellers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.