नांदगाववासीय घेणार मोकळा श्वास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 16, 2017 11:14 PM2017-11-16T23:14:36+5:302017-11-16T23:15:20+5:30
शहरात कचरा निक्षेपण भूमी (डम्पिंग ग्राऊंड) नसल्यामुळे कचरा नेमका कुठे नेऊन टाकावा, हा प्रश्न न.प. प्रशासनासमोर उभा ठाकला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नांदगाव खंडेश्वर : शहरात कचरा निक्षेपण भूमी (डम्पिंग ग्राऊंड) नसल्यामुळे कचरा नेमका कुठे नेऊन टाकावा, हा प्रश्न न.प. प्रशासनासमोर उभा ठाकला आहे. ठिकठिकाणी कचºयाचे ढिगारे उभे झाल्याने न. प. मुख्याधिकारी व तहसीलदारांनी जागेसंदर्भातील शासनाला प्रस्ताव पाठविला आहे. जागेची पाहणीसुद्धा झाली. त्यामुळे शहरवासीयांची अस्वच्छतेच्या गर्तेतून लवकरच सुटका होणार आहे.
नांदगावनजीक मौजा चिंचोली येथील ५ हेक्टर ५९ आर ई-क्लास जमिनीवर कचरा निक्षेपण भूमी होणार असून, बांधकामासाठी चौदाव्या वित्त आयोगातील निधीचा वापर होणार आहे.
मुख्याधिकारी नीलेश जाधव यांनी १३ एप्रिलला यासंदर्भातील प्रस्ताव तहसीलदारांकडे सादर केला व तहसीलदार मनोज लोणारकर यांनी स्थळ निरीक्षण केले. कचरा निक्षेपण भूमीसाठी जागेची पाहणी करताना तहसीलदार मनोज लोणारकर, न. प. मुख्याधिकारी नीलेश जाधव, पाणी पुरवठा सभापती फिरोज खान, विकास दबघडे उपस्थित होते.