दर महिन्याला गरोदर मातांची मोफत तपासणी

By admin | Published: November 9, 2016 12:28 AM2016-11-09T00:28:20+5:302016-11-09T00:28:20+5:30

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नवीन संकल्पना राबवीत देशभरातील स्त्रीरोग तज्ज्ञांसह सर्वच डॉक्टरांनी ९ तारखेपासून ...

Free examination of pregnant mothers every month | दर महिन्याला गरोदर मातांची मोफत तपासणी

दर महिन्याला गरोदर मातांची मोफत तपासणी

Next

मोनाली ढोलेंचा पुढाकार : पंतप्रधानांच्या आवाहनाची उत्स्फूर्त दखल
अमरावती : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नवीन संकल्पना राबवीत देशभरातील स्त्रीरोग तज्ज्ञांसह सर्वच डॉक्टरांनी ९ तारखेपासून गरोदर मातांची तसेच इतर रूग्णांची मोफत तपासणी करावी, असे आवाहन केले आहे. गरजू रूग्णांना योग्य औषधोपचार मिळावेत, तज्ज्ञांकडून त्यांना योग्य सल्ला मिळावा, कोणताही रूग्ण औषधोपचारापासून वंचित राहू नये, याकरिता पंतप्रधानांनी हा उपक्रम राबविण्याचे ठरविले आहे. पंतप्रधानांच्या या आवाहनाला प्रतिसाद देत शहरातील प्रसिद्ध प्रसूतीरोग तज्ज्ञ मोनाली ढोले यांनी बुधवार ९ नोव्हेंबरपासून स्वत: पुढाकार घेत हा उपक्रम राबविण्याचा निर्णय घेतला आहे.
भारतासारख्या प्रगतीशील देशात रूग्णांना, तळागाळातील गोरगरिबांना वैद्यकीय सेवेची नितांत गरज आहे. देशभरात ज्या गतीने मातामृत्युंचा दर कमी व्हायला हवा, तेवढा कमी होेताना दिसत नाही.
यामध्ये आरोग्याबाबत जनजागृतीचा अभाव हे प्रमुख कारण आहे. तसेच आरोग्यासाठी पैसे खर्च करण्याची रूग्णांची आणि त्यांच्या कुटुंबियांची मानसिकता नसणे हे देखील एक प्रमुख कारण आहे. त्यामुळेच रोगराईने होणाऱ्या मृत्युंची संख्या भारतात वाढती आहे. या प्रकाराला अंकुश लावायचा असेल तर रूग्णांसह त्यांच्या कुटुंबियांनीदेखील जागृत होण्याची गरज आहे. देशात भरपूर शासकीय रूग्णालये आहेत. तेथे योग्य ती आरोग्य सेवा पुरविली जाते. पण, रूग्ण त्याचा लाभ घेत नाहीत.
त्यामुळेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ९ नोव्हेंबरपासून प्रत्येक तज्ज्ञ डॉक्टरने एक दिवस नि:शुल्क रूग्णसेवा करण्याचे आवाहन केले आहे. या आवाहनाला प्रतिसाद देत स्वत: पुढाकार घेऊन शहरातील प्रसिद्ध प्रसूतीरोगतज्ज्ञ मोनाली ढोले यांनी मोफत मातृ-रूग्णसेवेसाठी पुढाकार घेतला आहे. दर महिन्याच्या ९ तारखेला मोनाली ढोले यांच्या ‘ढोले हॉस्पिटल’ मार्फत हा उपक्रम राबविला जाईल. (प्रतिनिधी)

महिलांनी घ्यावा लाभ
रूख्मिणीनगरातील ढोले हॉस्पिटलमध्ये दर महिन्याच्या ९ तारखेला प्रसूतीरोगतज्ज्ञ मोनाली ढोले या गरोदर माता-रूग्णांची मोफत तपासणी करणार असून रूग्णांनी मोठ्या संख्येने या उपक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले आहे. स्त्रीरोग व प्रसूतीशास्त्र संघटनेचा या कार्याला पाठिंबा मिळेल आणि इतर प्रसूतीतज्ज्ञही या उपक्रमात सहभागी होतील, असे आवाहनही मोनाली ढोले यांनी केले आहे.

Web Title: Free examination of pregnant mothers every month

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.