मोर्शी तालुका ड्रायझोनमुक्त करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 17, 2021 04:11 AM2021-07-17T04:11:12+5:302021-07-17T04:11:12+5:30

किसान मोर्चाची मागणी, कमलसिंह चितोडिया यांचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन मोर्शी : तालुक्यातील पिंपळखुटा (मोठा) येथील ७० गावे पाणीपुरवठा योजना पूर्ववत ...

Free Morshi taluka dryzone | मोर्शी तालुका ड्रायझोनमुक्त करा

मोर्शी तालुका ड्रायझोनमुक्त करा

Next

किसान मोर्चाची मागणी, कमलसिंह चितोडिया यांचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

मोर्शी : तालुक्यातील पिंपळखुटा (मोठा) येथील ७० गावे पाणीपुरवठा योजना पूर्ववत सुरू करण्यात यावी तसेच जिल्ह्यातील सर्व गावे ड्राय झोनमधून मुक्त करण्यात यावी, अन्यथा गावागावांमध्ये जनआंदोलन छेडू व बेमुदत उपोषण सुरू करू, असा इशारा भारतीय जनता किसान मोर्चाचे प्रदेश सदस्य कमलसिंह चितोडिया यांनी दिला. जिल्हाधिकाऱ्यांमार्फत थेट मुख्यमंत्र्यांना याबाबत पत्र देण्यात आले.

महाराष्ट्र जीवन प्राधिकरण योजनेंतर्गत लाखो रुपये खर्च करून पिंपळखुटा (मोठा) येथील ७० गावे पाणीपुरवठा योजना अंमलात आणली. ही योजना सुरू झाल्यानंतर ७० गावातील लोकांना मुबलक व कायमस्वरूपी पाण्याचा पुरवठा होत होता. काही वर्षानंतर मात्र या योजनेला नियोजनाअभावी ग्रहण लागणे सुरू झाले. पिण्याच्या पाण्याचे विद्युत देयक थकीत झाल्यामुळे ही योजना बंद पडली. त्यामुळे गावागावात महाभयंकर दुष्काळ पडला परिणामी सर्व गावांमध्ये पिण्याच्या पाण्याची भीषण टंचाई निर्माण झाली. गावागावांतील वयोवृद्ध महिला, पुरुष व शाळकरी विद्यार्थ्यांना पिण्याच्या पाण्यासाठी दाहीदिशा भटकावे लागत असल्याचे पाहून सामाजिक कार्यकर्ता तथा भारतीय जनता पार्टीचे भटक्या-विमुक्त आघाडीचे जिल्हाध्यक्ष कमलसिंह चितोडिया यांच्या नेतृत्वात ७० गावे पाणीपुरवठा योजना सुरू करण्यात यावी, यासाठी शेकडो महिला पुरुषांनी तहसील कार्यालयासमोर बेमुदत उपोषण सुरू केले होते. याची दखल घेऊन तत्कालीन कृषिमंत्री अनिल बोंडे यांनी या योजनेच्या दुरुस्ती व देखभालीसाठी जवळपास तीन कोटी रुपये मंजूर करून ही योजना पूर्ववत सुरू करण्यासाठी प्रयत्न चालविले होते.

Web Title: Free Morshi taluka dryzone

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.