धामणगावात गरीब रुग्णांसाठी नि:शुल्क ऑक्सिजन बँक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 4, 2021 04:11 AM2021-06-04T04:11:43+5:302021-06-04T04:11:43+5:30
यु के च्या डॉ. सफल साबळे चा पुढाकार धामणगाव रेल्वे : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत रुग्णांना ऑक्सिजन साठी बऱ्याच ठिकाणी ...
यु के च्या डॉ. सफल साबळे चा पुढाकार
धामणगाव रेल्वे : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत रुग्णांना ऑक्सिजन साठी बऱ्याच ठिकाणी मनमानी पैसे घेतल्याचे चित्र दिसून येत आहे. ऑक्सिजनच्या प्रचंड तुटवडा भासू लागल्याने धामणगाव रेल्वे तालुक्यातील गरीब रुग्णांसाठी युके येथे रहिवासी असलेले डॉ. सफल साबळे यांनी आधार युवा बहुउद्देशीय मंडळ यांना ऑक्सिजन, जनरेटर व ऑक्सिमीटरचा पुरवठा करून दिले आहे. हे जनरेटर हवेतून ऑक्सिजन तयार करून त्याचा पुरवठा करते.
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत रुग्णांना ऑक्सिजनसाठी धावपळ करावी लागत आहे. ऑक्सिजन उपलब्ध नसल्यामुळे अनेक ठिकाणी रुग्णांना जीव गमवावा लागला. अशा संकटाच्या काळात आधार युवा बहुउद्देशीय मंडळाने पुढाकार घेत तालुक्यासह शहरातील गरीब रुग्णांसाठी ऑक्सिजन कॉन्संट्रेटर मशीन कोरोना रुग्णांसाठी निशुल्क उपलब्ध करून देत आहे.
या मंडळाचे अध्यक्ष विशाल सुटे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रफुल साबळे, मंगेश देशमुख, आशिष केने, मंगेश वानखडे, अमित चौधरी, राजेश सरपे, अभि शेंडे, गोलू यादव, पवन धांदे, राहुल पाटील, ऋषिकेश गोरडे, प्रताप जाधव, रितेश देशमुख, कुणाल बुटले, शरद गुल्हाने, असे असंख्य कार्यकर्ते कोरोना योद्धा म्हणून संस्थेत समाजसेवा करीत आहे.