फुकट्या प्रवाशांना ठोकला ५६० रुपयांचा ऑन दि स्पाॅट दंड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 26, 2021 04:14 AM2021-09-26T04:14:30+5:302021-09-26T04:14:30+5:30
एसटी महामंडळ विनातिकीट तपासणी मोहीम जितेंद्र दखने अमरावती : एसटी महामंडळाच्या बसमधून विनातिकीट प्रवास करणाऱ्या प्रवाशांची ...
एसटी महामंडळ विनातिकीट तपासणी मोहीम
जितेंद्र दखने
अमरावती : एसटी महामंडळाच्या बसमधून विनातिकीट प्रवास करणाऱ्या प्रवाशांची तपासणी मोहीम २२ सप्टेंबरपासून सुरू करण्यात आली आहे. एसटी प्रवासादरम्यान चार दिवसांत विनातिकीट प्रवास करताना ४ प्रवासी तपासणी पथकाला आढळून आले आहे. या प्रवाशांकडृन ४८० रुपये दंडाची ऑन दि स्पॉट वसुली करण्यात आली.
एसटी प्रवाशांमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी व विनातिकीट प्रवास करणाऱ्या प्रवाशांना आळा घालण्यासाठी राज्य परिवहन महामंडळामार्फत २२ सप्टेंबर ते ६ ऑक्टोबर अशी १५ दिवस तिकीट तपासणी मोहीम राबविली जात आहे. या मोहिमेत विभागातील छोट्यातील छोट्या बस मार्गावर तपासणी पथकातील व आगारातील सर्व पर्यवेक्षकीय कर्मचारी दररोज ५५० बस फेऱ्याची तपासणी केली जात आहे. तपासणी पथका कडून विनातिकीट तपासणी मोहिमेसोबत विना तिकीट प्रवास करू नये याकरिता जनजागृती करीत आहेत. याकरिता एसटी महामंडळाने विभागात ६ पथके नेमली आहेत. या पथकामार्फत विविध मार्गावर तसेच जिल्ह्यातील ८ एसटी आगारात बाहेरून येणाऱ्या एसटी बसेसची तपासणी केली जात आहे.
बॉक्स
दररोज ५५० बसेसची तपासणी
राज्य परिवहन महामंडळाने एसटी बस मध्ये विनातिकीट प्रवास करणाच्या प्रकाराला आळा घालण्यासाठी गत २२ सप्टेंबरपासून तिकीट तपासणी मोहीम सुरू केली आहे. यानुसार दररोज तपासणी पथकाव्दारे ५५० बसेसची तपासणी केली आहेत. यात प्रत्येक आगारात येणाऱ्या बसेसमधून उतरणाऱ्या प्रवाशांचीही तिकिटे तपासली जात आहेत.
बॉक्स
४६० रुपये दंडाची वसुली
राज्य परिवहन महामंडळाकडून विनातिकीट प्रवाशांची तपासणी मोहीम सुरू आहे. यामध्ये गत चार दिवसात ४ प्रवासी विनातिकीट प्रवास करताना आढळले. या फुकट्या प्रवाशांकडून ४६० रुपये प्रवास भाड्याचे दुप्पट रक्कम जीएसटीसह शनिवारी वसूल केली आहे. विनातिकीट प्रवाशांकडून किमान १०० रुपये दंड वसूल करण्याचे महामंडळाचे धोरण आहे.
बॉक्स
एकूण आगार -८
एकूण तपासणी पथके -६
तपासणी अधिकारी -१६
आतापर्यतची दंड वसुली -४८० रूपये
कोट
खेडेगावातून प्रवास करणाऱ्या आणि ग्रामीण भागातील नागरिकांना बहुधा तिकीट न काढण्याची सवय असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे गर्दीची संधी साधून तिकीट न काढता प्रवास करणाऱ्यांची संख्या वाढल्याने महामंडळाचे उत्पन्न बुडत असून, अशा प्रवाशाकडून दंड वसूल केला जात आहे.
- श्रीकांत गभणे,
विभाग नियंत्रक