रेशनकार्डवर मोफत साडी; होळीचा रंग होणार गहिरा! १.२८ लाख अंत्योदय कुटुंबांना रेशनकार्डावर मिळणार लाभ
By गजानन उत्तमराव मोहोड | Published: February 2, 2024 10:04 PM2024-02-02T22:04:31+5:302024-02-02T22:04:43+5:30
कप्टिव्ह योजनेतंर्गत जिल्ह्यातील अंत्योदय १,२७,४६५ रेशन कार्डधारकांना प्रत्येकी एक मोफत साडी पुरवठा विभागाद्वारे करण्यात येणार आहे.
अमरावती : कप्टिव्ह योजनेतंर्गत जिल्ह्यातील अंत्योदय १,२७,४६५ रेशन कार्डधारकांना प्रत्येकी एक मोफत साडी पुरवठा विभागाद्वारे करण्यात येणार आहे. रेशन दुकानातून होळीपर्यंत या साड्यांचे वाटप होणार आहे. तसे आदेश अन्न व नागरी पुरवठा विभागाने २५ जानेवारीला जिल्हा पुरवठा विभागाला दिले आहेत.
राज्य यंत्रमाग महामंडळाद्वारा अंत्योदय शिधापत्रिकाधारक कुटुंबांच्या यादीनुसार साड्यांचे गठ्ठे तयार करून प्रत्येक तालुक्यातील रेशन दुकानात पोहोचविण्यात येणार आहेत व या सर्व प्रक्रियेची ऑनलाइन नोंद राहणार असल्याचे जिल्हा पुरवठा विभागाने सांगितले. प्रजासत्ताक दिन (२६ जानेवारी) ते होळी (२४ मार्च) यादरम्यान या सर्व लाभार्थी कुटुंबांना प्रत्येकी एक साडी देण्यात येणार असल्याचे पुरवठा विभागाने सांगितले.