फेसबुकवर ओळख झालेल्या युवतीवर वारंवार अत्याचार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 5, 2020 04:19 AM2020-12-05T04:19:14+5:302020-12-05T04:19:14+5:30

अमरावती : फेसबुकवर ओळख झाल्यानंतर प्रेमसूत जुळले. लग्नाचे आमिष दाखवून एका युवतीवर अमरावती, शेगाव, नागपूर व पचमढी येथे ...

Frequent atrocities on a young woman identified on Facebook | फेसबुकवर ओळख झालेल्या युवतीवर वारंवार अत्याचार

फेसबुकवर ओळख झालेल्या युवतीवर वारंवार अत्याचार

Next

अमरावती : फेसबुकवर ओळख झाल्यानंतर प्रेमसूत जुळले. लग्नाचे आमिष दाखवून एका युवतीवर अमरावती, शेगाव, नागपूर व पचमढी येथे नेऊन शारीरिक अत्याचार केल्याची घटना फ्रेजरपुरा ठाण्याच्या हद्दीतील दस्तुनगर येथे १३ मार्च २०१७ ते २ डिसेंबर २०२० दरम्यान घडली. याप्रकरणी पोलिसांनी एका युवकाविरुद्ध गुरुवारी गुन्हा नोंदविला.

पोलीससूत्रानुसार, निखिल राजेश सहारे (२६, रा. फ्रेजरपुरा), असे आरोपीचे नाव आहे. त्याला पोलिसांनी अटक केली असून, न्यायालयाने दोन दिवसांचा पीसीआर सुनावला आहे. आरोपीची युवतीशी फेसबुकवर ओळख झाली. त्यानंतर प्रेमसंबंध जुळले. सेवाग्राम रेल्वे स्टेशन येथे दोघांची भेट झाली. ते दोघेही दुचाकीने दस्तुरनगरातील आरोपीच्या मित्राच्या रूमवर आले. आरोपीने तिला लग्नाचे आमीष दाखवून मित्राच्या रूमवरच तिच्याशी शारीरिक संबध प्रस्तापीत केले. त्यानंतर त्याने शेगाव येथे तिला एका लॉजवर नेऊन तिच्यावर अत्याचार केला. सन २०१७ मध्ये आरोपीच्या आतेभावाचे नागपुर येथे लग्न असल्याने तेथे आल्यानंतरसुद्धा फ्रेन्ड्स कॉलनीतील एका मित्राच्या रूमवर तिला नेऊन आरोपीने शारीरिक संबंध प्रस्थापित केले. सन २०१९ मध्ये तिला मध्यप्रदेशातील पचमढी येथील लॉजवर नेऊन अत्याचार केला. तसेच ७ व ८ सप्टेंबरला आरोपी हा युवतीच्या घरी आला. तेव्हाही त्याने अत्याचार केला. यानंतर मात्र युवतीने आरोपीला २ डिसेंबरला लग्नाची गळ घातली असता, त्याने युवतीला थापडाबुक्क्यांनी मारहाण करून लग्न करण्यास नकार दिल्याने युवतीने पोलिसांत धाव घेतली. आरोपीविरुद्ध भादंविचे कलम ३७६, ३७६(२), (एन)३२३, ५०४ अन्वये गुन्हा नोंदविला.

Web Title: Frequent atrocities on a young woman identified on Facebook

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.