संकटे, आव्हानांना सामोरे जाण्यासाठी बळ देते मैत्री
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 1, 2021 04:12 AM2021-08-01T04:12:38+5:302021-08-01T04:12:38+5:30
आंतरराष्ट्रीय मैत्री दिन साजरा करण्यासाठी संयुक्त राष्ट्र संयुक्त राष्ट्र सरकार, आंतरराष्ट्रीय संस्था आणि नागरी समाज गटांना सभ्यता, एकता, परस्पर ...
आंतरराष्ट्रीय मैत्री दिन साजरा करण्यासाठी संयुक्त राष्ट्र संयुक्त राष्ट्र सरकार, आंतरराष्ट्रीय संस्था आणि नागरी समाज गटांना सभ्यता, एकता, परस्पर समंजसपणा आणि सलोखा यांच्यातील संवाद वाढवण्यासाठी आंतरराष्ट्रीय समुदायाच्या प्रयत्नांना हातभार लावणारे कार्यक्रम, उपक्रम आणि उपक्रम आयोजित करण्यास मैत्रीच प्रोत्साहित करते. आंतरराष्ट्रीय मैत्री दिवस हा एक उपक्रम आहे.
प्रतिक्रिया
विद्यार्थी जीवनात एकमेकांशी मैत्री असणे आवश्यक आहे. यातून विचारांची, शैक्षणिक, सामाजिक व राजकीय बाबींची देवाण-घेवाण होते. द्वेश, मत्सर दूर होऊन प्रेमभाव निर्माण होण्यास मदत होते. त्यामुळे मैत्रीचा भाव प्रत्येकात असावा.
- कुणाल पातुरकर,
विद्यार्थी, शासकीय औद्योगिक संस्था
---
कॉलेजवयीनांमध्ये मैत्री असल्यास कुठलीही कामे अडत नाही. कुणाशी वैर होऊन भांडण उद्भवत नाही. त्यामुळे अभ्यासात बाधा पोहचत नाही. चांगल्या विचारांची आदान-प्रदान होते. तसेच इतरही क्षेत्रात काम करताना मैत्रीचे भाव असणे आवश्यक आहे.
- साहिल खोब्रागडे, विद्यार्थी, शासकीय औद्योगिक संस्था
-
खासगी क्षेत्रात सामंजस्याने सर्वांशी मनमिळावूपणाने वागून कामे केल्यास कामात कुठलाही अडथळा येत नाही. आपल्या तक्रारी वरिष्ठांपर्यंत जात नाही. कुठली कामे थांबत नाही आणि अंहकारातून द्वेश निर्माण होतो. त्यामुळे कामावर विपरीत परिणाम होतो. म्हणून मैत्रीपूर्ण जीवन असणे गरजेचे आहे.
- चेतन म्हस्के, नोकरदार