मध्य रेल्वेला ऑक्टोंबरमध्ये भंगारातून ३०. ४० कोटींचा महसूल
By गणेश वासनिक | Published: November 18, 2023 04:24 PM2023-11-18T16:24:26+5:302023-11-18T16:25:37+5:30
‘झिरो स्क्रॅप’ मिशनला गती, यंदा आर्थिक वर्षात आतापर्यंत २२३.८५ कोटींची भंगार विक्री
अमरावती : मध्य रेल्वेच्या मुंबई विभागाने ओव्हरहेड लोको, डिझेल सरप्लस लोको, ऑपरेशनल रेल्वे लाईन्स आणि अतिवृद्ध किंवा अपघाती लोको,कोच यासह विविध प्रकारचे भंगार ओळणे आणि त्यांची विल्हेवाट लावण्यासाठी महत्त्वपूर्ण पावले उचलली आहे. ‘झिरो स्क्रॅप’ मिशन अंतर्गत भंगाराचे महसुलात बदलले झाले असून, गत ऑक्टोंबर महिन्यात ३०.४० कोटींची कमाई झाल्याची नाेंद करण्यात आली आहे.
मध्य रेल्वेने प्रत्येक विभाग, कार्यशाळा आणि शेड विहित वेळेत भंगार साहित्यापासून पूर्णपणे मुक्त असल्याची खात्री करण्यासाठी हा त्याच्या ‘झिरो-स्क्रॅप’ मिशनचा एक भाग आहे. या दृढनिश्चयी प्रयत्नांचे प्रभावी परिणाम मिळाले आहे. मध्य रेल्वेने २२३.८५ कोटींच्या भंगार विक्रीचा पल्ला गाठला आहे. ३१ ऑक्टोबर २०२३ रोजी १६० कोटींच्या आनुपातिक विक्री उद्दिष्टाच्या तुलनेत या कालावधीतील आनुपातिक विक्री उद्दिष्टापेक्षा ३९.९१ टक्क्यांची उल्लेखनीय वाढ आहे. झिरो स्क्रॅप मिशन अंतर्गत सर्व विभाग आणि डेपोंना भंगारमुक्त दर्जा मिळवून देण्यासाठी मध्य रेल्वे वचनबद्धतेवर ठाम राहिली आहे आणि रेल्वे बोर्डाचे २०२३-२४ वर्षासाठी ३०० कोटीचे उद्दिष्ट ओलांडले आहे. रूळ, कायमस्वरूपी साहित्य, बिन लोखंडी वस्तू, वॅगन्स, लोको, इतर साहित्याची ई-निविदा प्रसिद्ध करून भंगार विक्री करण्यात आल्याची माहिती मध्य रेल्वे मुंबई विभागाच्या जनसंपर्क अधिकाऱ्यांनी दिली.
अशी झाली भंगारच्या साहित्याची विक्री
• १५,९५० मेट्रिक टन रेल्वे रूळ
• १३ लोकोमोटिव्ह
• २०३ कोच
• ११३ वॅगन्स (भुसावळ विभागातील २० किमी जामनेर-पाचोरा सेक्शन नॅरो गेज लाईनसह.)
भंगार विक्रीतून विभागनिहाय महसूल
विभाग / कार्यशाळा महसूल (कोटींमध्ये)
- भुसावळ विभाग ४७.११
- माटुंगा डेपो ३७.४५
- मुंबई विभाग ३३.२७
- इलेक्ट्रिक लोको शेड डेपो-भुसावळ २१.२३
- पुणे विभाग २०.२९
- सोलापूर विभाग १९.००
- नागपूर विभाग १६.६३
- या व्यतिरिक्त मध्य रेल्वेच्या इतर विभाग/कार्यशाळेत भंगार विक्री २८.८७