दर्यापुरात स्पर्धा परीक्षार्थींचा मोर्चा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 21, 2018 11:09 PM2018-02-21T23:09:24+5:302018-02-21T23:09:44+5:30
तालुक्यातील शेकडो स्पर्धा परीक्षार्थी व बेरोजगार विद्यार्थ्यांनी विविध मागण्यांकरिता बुधवारी तहसील कार्यालयावर मोर्चा काढला.
आॅनलाईन लोकमत
दर्यापूर : तालुक्यातील शेकडो स्पर्धा परीक्षार्थी व बेरोजगार विद्यार्थ्यांनी विविध मागण्यांकरिता बुधवारी तहसील कार्यालयावर मोर्चा काढला. यावेळी काळ्या फिती लावून निषेध नोंदविण्यात आला.
सद्यस्थितीत प्रशासनातील लाखो जागा रिक्त आहेत. त्यामुळे सामान्य जनतेची महत्त्वाची कामे खोळंबली आहेत. शासनाचे कामकाज ठप्प झाले आहेत. नोकरकपातीचे धोरण राज्य शासनाचे अंगीकारल्याने अनेक वर्षांपासून स्पर्धा परीक्षेची तयारी करणाºया युवकांमध्ये नैराश्श्याची भावना निर्माण झाली आहे. हा अन्याय दूर करावा. एम.पी.एस.सी. (महाराष्ट्र लोकसेवा आयोग) परीक्षेचे शुल्क कमी करावे. तामिळनाडू पॅटर्न लागू करावे. संयुक्त परीक्षा रद्द करण्यात याव्यात. एम.पी.एस.सी.च्या सर्व परीक्षांकरिता प्रतीक्षा यादी लावण्यात यावी. राज्यसेवेच्या ६९ पदांमध्ये वाढ करण्यात यावी.
पोलीस भरतीच्या पदांमध्ये वाढ करण्यात यावी, अशा विविध मागण्या विद्यार्थ्यांकडून करण्यात आल्या आहेत. तहसीलदार अमोल कुंभार यांना यासंदर्भात विविध संघटनांच्या विद्यार्थ्यांकडून निवेदन देण्यात आले. हा मोर्चा शिस्तीत पार पाडण्यात आला. यावेळी शेकडो विद्यार्थी तहसील कार्यालयावर जमले होते. तहसीलदारांनी त्यांचे निवेदन स्वीकारून म्हणणे समजावून घेतले.