भातकुली, खोलापुरी गेट ठाण्याच्या इमारतींना निधी द्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 26, 2021 05:00 AM2021-12-26T05:00:00+5:302021-12-26T05:00:59+5:30
माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यकाळात मंजूर झालेल्या व प्रत्यक्ष काम सुरू झालेल्या मेळघाट चिखलदरा येथील पर्यटकांचे आकर्षण स्थळ ठरणाऱ्या व स्थानिकांच्या रोजगार निर्मितीस पूरक ठरणाऱ्या आशिया खंडातील तिसऱ्या क्रमाकांचे स्कायवॉकचे काम ८० टक्के पूर्ण झाले असून निधीअभावी २० टक्के काम रखडले आहे. पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी लक्ष घालून तत्काळ निधीची तरतूद करावी व या स्कायवॉकला “छत्रपती शिवाजी महाराज”यांचे नाव द्यावे, .....
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : भातकुली व खोलापुरी गेट पोलीस ठाण्यांच्या स्वतंत्र इमारत निर्मितीसाठी निधी मिळावा, अंजनगाव बारी येथे स्वतंत्र पोलीस ठाण्याची निर्मिती करावी, अशी मागणी आमदार रवि राणा यांनी शनिवारी विधानसभेत केली. दरम्यान, पोलिसांच्या विविध समस्या, प्रश्नावरही त्यांनी राज्य सरकारचे लक्ष वेधले.
आमदार रवी राणा यांनी पुरवणी मागण्या चर्चेवेळी विधानसभेत मागणी करताना पोलीस बांधवांच्या व्यथा मांडल्यात. पोलीस दरदिवशी तणावपूर्ण स्थितीत अहोरात्र काम करतात. त्यांना कर्तव्य चांगल्या पद्धतीने बजावता यावे यासाठी वेतनात वाढ करावी, अशी मागणी आमदार राणा यांनी केली.
अहोरात्र सामान्य नागरिकांचे रक्षण करणाऱ्या व कायदा व सुव्यवस्था अबाधित राखून जातीय सलोखा कायम ठेवण्यासाठी झटणाऱ्या पोलीस बंधू-भगिनींना चांगल्या निवासी सुविधा द्या, अशी मागणीही आमदार रवि राणा यांनी केली.
माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यकाळात मंजूर झालेल्या व प्रत्यक्ष काम सुरू झालेल्या मेळघाट चिखलदरा येथील पर्यटकांचे आकर्षण स्थळ ठरणाऱ्या व स्थानिकांच्या रोजगार निर्मितीस पूरक ठरणाऱ्या आशिया खंडातील तिसऱ्या क्रमाकांचे स्कायवॉकचे काम ८० टक्के पूर्ण झाले असून निधीअभावी २० टक्के काम रखडले आहे. पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी लक्ष घालून तत्काळ निधीची तरतूद करावी व या स्कायवॉकला “छत्रपती शिवाजी महाराज”यांचे नाव द्यावे, अशी मागणी आमदार रवि राणा यांनी विधानसभेत केली.
मागण्या लवकरात लवकर पूर्ण करून विदर्भ विकासाला हातभार लावावा, असे आवाहनदेखील आमदार राणा यांनी केले.