आपदग्रस्तांच्या मदतीसाठी ४ कोटी ७१ लाखांचा निधी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 30, 2021 05:00 AM2021-09-30T05:00:00+5:302021-09-30T05:00:59+5:30
अतिवृष्टी व पूरस्थितीमुळे पडझड झालेली घरे, झोपडी, गोठे, दुकानदार, टपरीधारक, कुक्कुटपालन शेड, शेतजमीन आदींच्या नुकसानासाठी बाधितांना राज्य आपत्ती प्रतिसाद निधी व राज्य शासनाच्या निधीतून मदत वितरित करण्यात आली आहे. अतिवृष्टीनंतर पालकमंत्री ठाकूर यांनी स्वत: गावोगावी दौरे करून पंचनाम्याच्या प्रक्रियेबाबत गतिमान कार्यवाहीचे आदेश दिले होते. याबाबत शासनाकडेही पाठपुरावा केला.
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : जुलैमध्ये अतिवृष्टीने झालेल्या नुकसानाच्या भरपाईसाठी अमरावती जिल्ह्यासाठी ४ कोटी ७१ लाख ९८ हजार रुपयांचा निधी अर्थसंकल्पीय वितरण प्रणालीवर वितरित करण्यात आला. याबाबत उर्वरित निधीही लवकरच मिळवून दिला जाईल. एकही बाधित व्यक्ती लाभापासून वंचित राहू देणार नाही, अशी ग्वाही पालकमंत्री यशोमती ठाकूर यांनी मंगळवारी दिली.
अतिवृष्टी व पूरस्थितीमुळे पडझड झालेली घरे, झोपडी, गोठे, दुकानदार, टपरीधारक, कुक्कुटपालन शेड, शेतजमीन आदींच्या नुकसानासाठी बाधितांना राज्य आपत्ती प्रतिसाद निधी व राज्य शासनाच्या निधीतून मदत वितरित करण्यात आली आहे. अतिवृष्टीनंतर पालकमंत्री ठाकूर यांनी स्वत: गावोगावी दौरे करून पंचनाम्याच्या प्रक्रियेबाबत गतिमान कार्यवाहीचे आदेश दिले होते. याबाबत शासनाकडेही पाठपुरावा केला.
आपत्तीच्या काळाच आवश्यक निधी यापुढेही मिळवून दिला जाईल. महाविकास आघाडी शासन शेतकरी बांधव व नागरिकांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे, असे ना. ठाकूर यांनी सांगितले.
जिल्हाधिकाऱ्यांकडून तालुक्यांना निधी वितरणाचा आदेश
जिल्हा प्रशासनाकडून निधीचे तालुकानिहाय वितरण करण्यात आले असून त्याबाबतचा आदेश जिल्हाधिकारी पवनीत कौर यांनी सर्व तहसीलदारांना जारी केला आहे. सर्व संबंधितांना गतीने निधीचे वाटप करावे. निधी वितरणानंतर रक्कम वाटप करण्यात आलेल्या लाभार्थींची यादी रकमेच्या माहितीसह जिल्हाधिकारी कार्यालयाच्या संकेत स्थळावर प्रसिद्ध करावी, असे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत.