खड्डे खोदण्यासाठी निधी दिला, वृक्ष लागवडीसाठी केव्हा?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 4, 2021 04:10 AM2021-06-04T04:10:46+5:302021-06-04T04:10:46+5:30

३० टक्के अनुदानावर डोलारा, शासनाकडून वृक्ष लागवडीचे लक्ष्यांक नाही, यंदा नियोजन कोलमडणार अमरावती : दरवर्षी वन विभागात मोठा गाजावाजा ...

Funded for digging pits, when to plant trees? | खड्डे खोदण्यासाठी निधी दिला, वृक्ष लागवडीसाठी केव्हा?

खड्डे खोदण्यासाठी निधी दिला, वृक्ष लागवडीसाठी केव्हा?

Next

३० टक्के अनुदानावर डोलारा, शासनाकडून वृक्ष लागवडीचे लक्ष्यांक नाही, यंदा नियोजन कोलमडणार

अमरावती : दरवर्षी वन विभागात मोठा गाजावाजा करून राबविल्या जाणाऱ्या वृक्ष लागवड माेहिमेवर यंदाही कोरोनाचे संकट कायम आहे. त्यामुळे किती टक्के वृक्षलागवड होईल, याचे नियोजन आखताना वनाधिकाऱ्यांची कसरत होत आहे. खड्डे खोदण्यासाठी निधी दिला. पण, वृक्ष लागवडीसाठी केव्हा, असा सवाल उपस्थित होत आहे.

वृक्ष लागवडीचे उत्तरदायित्व हे सामाजिक वनीकरण, वनविभाग, व्याघ्र प्रकल्प यांच्याकडे प्रामुख्याने आहे. यावर्षी १ जुलैपासून वृक्ष लागवड मोहीम राबविली जाणार आहे. मात्र, वृक्षलागवडीचे नियोजन जिल्हास्तरावर करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. गतवर्षीसुद्धा कोरोना संसर्गामुळे लक्ष्यांकाप्रमाणे वृक्षलागवड झाली नसल्याने रोपटे जळाले, रोपटे खराब झालेत, काही ठिकाणी करपल्याचे उदाहरण समाेर आले आहे. सामाजिक वनीकरण, वनविभागाच्या रोपवाटिकेत विविध जाती, प्रजातींचे रोपटे तयार करण्यात आले आहेत. मात्र, शासनाकडून लक्ष्यांक नसल्याने वनाधिकारी बिनधास्त असल्याचे चित्र आहे. सामाजिक वनिकरणाने जिल्हानिहाय वृक्षलागवडीसाठी नियोजन चालविले असून, १ जुलैपासून शासकीय जमीन, जंगल क्षेत्रात वृक्ष लागवड करण्यात येणार आहे. यंदा वृक्षलागवडीसाठी केवळ ३० टक्के निधी देण्यात येणार असल्याची माहिती आहे. आतापर्यंत वृक्षलागवडीच्या अनुषंगाने खड्डे खोदण्यासाठी निधी मिळाला. मात्र, वृक्षलागवडीसाठी निधीची प्रतीक्षा आहे. अमरावती येथील सामाजिक वनिकरणाने ४ लाख ९३ हजार वृक्षलागवडीचे नियोजन करण्यात आले आहे.

बॉक्स

रोजगार हमी योजनेतून वृक्ष लागवडीला प्राधान्य

राज्यात वृक्ष लागवडीसाठी निधीची वानवा असल्याने वन विभागाने महसूल विभागाच्या सहकार्याने महाराष्ट्र रोजगार हमी योजनेतून वृक्षलागवडीचे नियोजन चालविले आहे. सामाजिक वनिकरण, वन विभागाकडून जिल्हाधिकाऱ्यांनी वृक्ष लागवडीसंदर्भात प्रस्ताव मागविले आहे.

-------------

कोट

यंदा पावसाळ्यात १ जुलैपासून राज्य योजनेंतर्गत व जिल्हा वार्षिक योजनेंतर्गत वृक्षलागवडीची कामे करण्यात येणार आहेत. कुरण विकास कार्यक्रम अंतर्गत रोपवनाचे उद्दिष्ट पूर्ण केले जाणार आहे. यात अमरावती, मेळघाट, अकोला, बुलडाणा विभागात २०,७४,८२० लक्ष्यांक पूर्ण केले जाईल.

- हरिश्चंद्र वाघमाेडे, विभागीय वनाधिकारी, अमरावती

Web Title: Funded for digging pits, when to plant trees?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.