ग्रामीण विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 21, 2022 05:00 AM2022-03-21T05:00:00+5:302022-03-21T05:00:59+5:30
दिवाणखेड येथे ११ लक्ष रुपयांच्या निधीतून स्थानिक रस्त्याच्या कामाचे, २० लक्ष रुपयांच्या निधीतून मूलभूत सुविधा निधीअंतर्गत मार्डी-तिवसा येथील गणपती मंदिर ते पेट्रोल पंपाकडे जाणाऱ्या रस्त्याचे काँक्रीटीकरणच्या कामाचे, स्थानिक रस्त्याच्या कामाचे व पारधी वस्ती ते बळिराम महाराज मंदिरापर्यंत करण्यात येणाऱ्या रस्त्याचे भूमिपूजन ना. ठाकूर यांच्या हस्ते करण्यात आले.
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : जिल्ह्यातील ग्रामीण भाग औद्योगिकदृष्ट्या स्वयंपूर्ण व सक्षम व्हावा, यासाठी बळकट व सुरक्षित रस्त्यांची निर्मिती करण्यात येत आहे. ग्रामीण भागातील नागरिकांसाठी दळणवळणासह इतर नागरी सुविधांच्या निर्मितीसाठी विकासनिधी कमी पडू देणार नाही, अशी ग्वाही रविवारी महिला व बाल कल्याण मंत्री यशोमती ठाकूर यांनी दिली.
तिवसा तालुक्यातील दिवाणखेड, मार्डी, चेनुष्ठा, जहागिरपुर, बोर्डा, आखतवाडा, धामंत्री, उंबरखेड, तारखेड, मोझरी येथील रस्त्यांच्या कामाचे भूमिपूजन ना. ठाकूर यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी त्या बोलत होत्या. दिवाणखेड येथे ११ लक्ष रुपयांच्या निधीतून स्थानिक रस्त्याच्या कामाचे, २० लक्ष रुपयांच्या निधीतून मूलभूत सुविधा निधीअंतर्गत मार्डी-तिवसा येथील गणपती मंदिर ते पेट्रोल पंपाकडे जाणाऱ्या रस्त्याचे काँक्रीटीकरणच्या कामाचे, स्थानिक रस्त्याच्या कामाचे व पारधी वस्ती ते बळिराम महाराज मंदिरापर्यंत करण्यात येणाऱ्या रस्त्याचे भूमिपूजन ना. ठाकूर यांच्या हस्ते करण्यात आले. येथे व्यायामशाळा, वाचनालय, दिवाणखेड-परसोडा रस्त्याचे खडीकरण, काँक्रीटीकरण, नाला खोलीकरण आदींच्या कामांसाठीचे प्रस्ताव तत्काळ सादर करण्याचे निर्देश त्यांनी दिले.
कुऱ्हा येथे प्राथमिक आरोग्य केंद्राच्या मुख्य इमारतीची दुरुस्ती, निवासस्थानाची दुरुस्ती, संरक्षक भिंतीची उभारणी, हरिजन वस्तीतील सौंदर्यीकरण, स्थानिक रस्त्याचे काँक्रीटीकरण, हनुमान मंदिर परिसरातील रस्त्याचे काँक्रीटीकरण आदी कामे १ कोटी १० लक्ष रुपयांच्या निधीतून करण्यात येत आहे. या कामांचे भूमिपूजन त्यांनी केले.
चेनुष्ठा येथे १ कोटी ५५ लाखांचा निधी
कुऱ्हा-चेनुष्ठा-बोर्डा येथे लहान पुलाचे बांधकाम, रस्ता काँक्रीटीकरण, रस्ता सुधारणेच्या १ कोटी ५५ लक्ष रुपयांच्या निधीतून करण्यात येणाऱ्या कामाचे भूमिपूजन ना. ठाकूर यांनी केले. बोर्डा-शिदवाडी येथील ३८ लक्ष रुपयांच्या निधीतून करण्यात येणाऱ्या कामाचे, आखतवाडा-धामंत्री रस्ता, उंबरखेड ते तारखेड रस्ता व नालीचे ३६ लक्ष निधीतून बांधकाम, दापोरी-जावरा रस्ता व पुलाचे १ कोटी ५० लक्ष निधीतून बांधकाम व मोझरी ते शेंदूरजना बाजार व मोझरी गावातील रस्त्याच्या बांधकामाचे भूमिपूजन ना. ठाकूर यांच्या हस्ते करण्यात आले. जिल्हा परिषद महिला व बाल कल्याण सभापती पूजा आमले, पंचायत समिती सभापती शिल्पा हांडे, तहसीलदार वैभव फरतारे उपस्थित होते.