शाळा इमारत दुरूस्तीसाठी निधीची बोळवण

By admin | Published: January 25, 2016 12:32 AM2016-01-25T00:32:32+5:302016-01-25T00:32:32+5:30

ग्रामीण भागात असलेल्या जिल्ह्यातील २९ ठिकाणी नवीन आणि काही वर्ग खोल्यांच्या दुरूस्तीसाठी जिल्हा परिषद शिक्षण समितीने सतत पाठपुरावा केला.

Funding for school building repair | शाळा इमारत दुरूस्तीसाठी निधीची बोळवण

शाळा इमारत दुरूस्तीसाठी निधीची बोळवण

Next

जिल्हा परिषद : शिक्षण समितीच्या मागणीला प्रतिसाद नाही
अमरावती : ग्रामीण भागात असलेल्या जिल्ह्यातील २९ ठिकाणी नवीन आणि काही वर्ग खोल्यांच्या दुरूस्तीसाठी जिल्हा परिषद शिक्षण समितीने सतत पाठपुरावा केला. या कामासाठी आवश्यक निधी जिल्हा नियोजन समितीकडून उपलब्ध होत नसल्याने निधी देण्याबाबत चालढकल करण्यात येत असल्याची खंत व्यक्त होत आहे.
जिल्हाभरात सुमारे १ हजार ६०२ शाळा आहेत. या ठिकाणी शिक्षण घेणाऱ्या ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना बसण्यासाठी सुव्यवस्थित वर्ग खोल्या नाहीत. त्यामुळे धोकाग्रस्त इमारतीत विद्यार्थ्यांना शिक्षणाचे धडे गिरवावे लागत आहेत. एकीकडे जिल्हा परिषद शाळांची गुणवत्ता खालावत असल्याचे सर्वत्र चिंता व्यक्त होत असताना ही परिस्थिती सुधारण्यासाठी राज्यापासून तर गावखेडयापर्यंत विविध नावीन्यपूर्ण उपक्रम राबविण्यात येत आहेत. दुसरीकडे ग्रामीण भागात जिल्हा परिषद शाळेत शिक्षण घेणाऱ्या गोरगरिबांच्या मुलांना शिक्षण घेण्यासाठी चांगल्या इमारती नसल्याने शिक्षक व विद्यार्थ्यांना आपला जीव संकटात टाकून शिक्षणाचे धडे घ्यावे लागत असल्याने ही परिस्थिती सुधारणे काळाची गरज आहे.
जिल्हा परिषदेच्या जिल्ह्यातील २९ शाळांना नवीन वर्ग खोल्या बांधणे अत्यंत गरजेचे आहे. याकरिता साधारणपणे दोन कोटी रूपयांची आवश्यकता आहे. गावामधील जिल्हा परिषद शाळांमधील वर्ग खोल्यांची दुरूस्ती करणे आवश्यक आहे. यासाठी साधारणपणे २ कोटी ३३ लाख रूपयांचा खर्च अपेक्षित आहे. त्यामुळे या कामासाठी जिल्हा परिषद शिक्षण समितीने ठराव घेऊन सर्व कामासाठी सुमारे पाच कोटी रूपयांच्या निधीची मागणी केली. यासाठी जिल्हा नियोजन समिती व शासनाकडे प्रस्ताव दिला आहे. (प्रतिनिधी)

खासगी शाळांमध्येही व्हाव्यात स्पर्धा
जिल्हा परिषद शाळामध्ये दरवर्षी केंद्र, तालुकास्तरावर आणि जिल्हास्तरावर क्रिडा स्पर्धा आयोजित करण्यात येतात. मात्र खासगी शाळांमध्ये अंतर्गत शालेय स्पर्धा होत नाहीत. त्यामुळे खासगी शाळेतही क्रिडा स्पर्धाचे आयोजन करण्यात यावे यासाठीचा ठराव जिल्हा परिषद शिक्षण समितीने घेतला आहे.
राज्य शासनामार्फत प्रत्येक जिल्ह्याला दिला जाणारा आदर्श शिक्षक पुरस्कार हा महात्मा जोतिबा फुले यांच्या नावाने द्यावा. असा ठराव जिल्हा परिषद शिक्षण समितीने घेवून हा ठराव शासनाकडे पाठविला आहे.

गावांत इमारतीसाठी तीन लाख
जिल्हा परिषदेच्या मेळघातील तीन गावात शाळेला इमारत नसल्याने या ठिकाणी जिल्हा नियोजन समितीने पुर्ननियोजनातून सुमारे २५ लाख रूपयाचा निधी मंजूर के ला आहे. त्यामुळे पोलिस पाटलाचे घरात भरत असलेल्या वर्ग खोल्याचा तिढा सुटला असला तरी नवीन वर्ग खोल्या व दुरूस्तीची समस्या निधी अभावी अद्याप काम आहे.

जिल्हा परिषद शिक्षण समितीने नवीन वर्ग खोल्या व दुरूस्तीसाठी निधी मिळावा याकरिता जिल्हा नियोजन समितीकडे प्रस्ताव दिला मात्र यासाठी निधी मिळाला नाही.याशिवाय शिक्षण समितीने आदर्श शिक्षक पुरस्कार महात्मा फु ले यांचे नावाने द्यावा व खासगी शाळेतही क्रिडा स्पर्धा घेण्याची शिफारस केली आहे
गिरीश कराळे,
सभापती शिक्षण व बांधकाम समिती

Web Title: Funding for school building repair

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.