निधी खर्चाचे निर्देश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 29, 2018 10:43 PM2018-01-29T22:43:31+5:302018-01-29T22:44:00+5:30
जिल्हा परिषदेला शासन व जिल्हा नियोजन समितीकडून चालू आर्थिक वर्षात मिळालेल्या निधीचा जमा खर्चाचा विस्तृत हिशेब सोमवारी वित्त व आरोग्य सभापती बळवंत वानखडे यांनी घेतला.
आॅनलाईन लोकमत
अमरावती : जिल्हा परिषदेला शासन व जिल्हा नियोजन समितीकडून चालू आर्थिक वर्षात मिळालेल्या निधीचा जमा खर्चाचा विस्तृत हिशेब सोमवारी वित्त व आरोग्य सभापती बळवंत वानखडे यांनी घेतला. यावेळी त्यांनी येत्या मार्चअखेरपर्यंत म्हणजेच आर्थिक वर्षे संपण्यापूर्वी निधी खर्च करावा, असे निर्देश जिल्हा परिषद अर्थसमितीच्या बैठकीत वित्त विभागाच्या अधिकाºयांना दिले.
जिल्हा परिषद समाज कल्याण विभागाकडे उपलब्ध असलेल्या निधीचे नियोजन, बांधकाम, शिक्षण, आरोग्य, कृषी, पाणीपुरवठा, सिंचन, महिला व बालकल्याण, पंचायत आदींसह अन्य विभागाला जिल्हा नियोजन समिती, जिल्हा निधी व शासनाकडून विविध योजनांसाठी चालू आर्थिक वर्षात प्राप्त झालेला एकूण निधी, कामांचे नियोजन, खर्च झालेला निधी व सद्यस्थितीत अखर्चित असलेल्या निधीचा सभापती बळवंत वानखडे यांनी संबंधित खाते प्रमुखांकडून विस्तूत आढावा घेतला. यावेळी उपलब्ध निधी हा आर्थिक वर्षातच खर्च करण्यात यावा, कुठलाही निधी अखर्चित व शासनाकडे परत जाता कामा नये, असे स्पष्ट निर्देश खातेप्रमुख व वित्त विभागाला सभापती बळवंत वानखडे यांनी दिले.
बैठकीला समिती सदस्य राजेंद्र बहुरूपी, सरला मावस्कर, वैशाली बोरकर, गजानन देवतळे, मुख्यलेखा व वित्त अधिकारी रवींद्र येवले, दतात्रय फिसके, सुरेश नाकील, उपमुख्य कार्यकारी अधिकारी माया वानखडे, समाजकल्याण अधिकारी मीणा अंबाडेकर आदींसह अन्य खातेप्रमुख उपस्थित होते.