बुद्धनगरीत उघड्यावरच करावा लागतो अंत्यसंस्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 3, 2020 04:22 AM2020-12-03T04:22:50+5:302020-12-03T04:22:50+5:30
निवेदननेरपिंगळाई : येथील वाॅर्ड क्रमांक ३ बुद्धनगरीतील नागरिकांना स्मशानकरिता जागा नसल्याने जागा मिळेल तेथे उघड्यावरच अंत्याविधी उरकावा लागतो. येथे ...
निवेदननेरपिंगळाई : येथील वाॅर्ड क्रमांक ३ बुद्धनगरीतील नागरिकांना स्मशानकरिता जागा नसल्याने जागा मिळेल तेथे उघड्यावरच अंत्याविधी उरकावा लागतो. येथे स्मशानभूमीसाठी जागा मिळावी, या मागणीचे ग्रामवासीयांचे निवेदन सामाजिक कार्यकर्ते विलास आमले यांचा पुढाकारातून खंडविकास अधिकारी व लोकप्रतिनिधींना देण्यात आले आहे.
नेरपिंगळाई हे मोर्शी तालुक्यातील सर्वाधिक लोकसंख्येचे गाव आहे. नागरिकांना भोंदूजी महाराज परिसरात व लेंडी नदीजवळ अंत्यविधी करण्याकरिता स्मशानभूमी उपलब्ध करून देण्यात आली. मात्र, वाॅर्ड नंबर ३ बुद्धनगरीतील नागरिकांना मात्र नेरपिंगळाई ते आखातवाडा रस्त्यावर जागा मिळेल तिथे खड्डा खोदून प्रेत दफन करावे लागते. स्मशान नसल्याने मृतदेहाची अवहेलना होत असून, बुद्धनगरीतील नागरिकांना हाल सोसावे लागत असल्याने गावातील सामाजिक कार्यकर्ते विकास आमले यांच्या नेतृत्वात पालकमंत्री यशोमती ठाकूर, आमदार देवेंद्र भुयार, जिल्हाधिकारी, तहसीलदार, खंडविकास अधिकारी, जिल्हा परिषद सस्य शरद मोहोड यांना निवेदन देण्यात आले. यावेळी अशोक अकोलकर, अमित मनोहरे, अक्षय खंडारकर, विश्वनाथ आमले, प्रफुल इंगळे, रामेश्वर इंगळे, राजेंद्र राऊत, अंबादास राऊत, पंकज मोर्चे, गौतम पांडे, गौतम तायडे, राजेश मानकर, सुरेंद्र लगड, रमेश काळे उपस्थित होते.
____________
श्रीकृष्ण मालपे,
वार्ताहर, नेरपिंगळाई