लर्निंग लायसन्स कॅम्पमध्ये कोरोना नियमावलीचा फज्जा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 14, 2021 04:16 AM2021-07-14T04:16:39+5:302021-07-14T04:16:39+5:30

फोटो कॅप्शन - सार्वजनिक बांधकाम विभागाच्या चिखलदरा स्टॉपवरील विश्रामगृहात अशाप्रकारे वाहन परवाना त्यामध्ये कोरोना नियम पायदळी तुडविण्यात आले ...

The fuss of the Corona Rules at the Learning License Camp | लर्निंग लायसन्स कॅम्पमध्ये कोरोना नियमावलीचा फज्जा

लर्निंग लायसन्स कॅम्पमध्ये कोरोना नियमावलीचा फज्जा

Next

फोटो कॅप्शन - सार्वजनिक बांधकाम विभागाच्या चिखलदरा स्टॉपवरील विश्रामगृहात अशाप्रकारे वाहन परवाना त्यामध्ये कोरोना नियम पायदळी तुडविण्यात आले

------------------------------------------------------------------------------------------

परतवाड्याच्या आरटीओ, कोरोना संपला की यांच्यासाठी वेगळे नियम?

ऑन दी स्पॉट

नरेंद्र जावरे

परतवाडा : कोरोनाची तिसऱ्या लाटेचा इशारा गंभीरतेने घेत देशपातळीवरून कोरोना प्रतिबंधात्मक नियमांचे पालन करण्यासाठी आदेशित केले असताना सोमवारी परतवाडा शहरातील आरटीओ विभागामार्फत चालक परवाना शिबिरात ही नियमावली पायदळी तुडवली गेल्याचा धक्कादायक प्रकार दिसून आला. त्यामुळे सामान्य नागरिकांसाठी वेगळा आणि शासकीय कामासाठी वेगळा नियम आहे का, असा प्रश्न निर्माण झाला आहे.

अमरावती जिल्ह्यात सोमवार ते शुक्रवारपर्यंत सकाळी ७ ते सायंकाळी ४ वाजेपर्यंत, तर शनिवार व रविवार या आठवड्याच्या दोन दिवस जीवनावश्यक वगळता इतर दुकाने बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी काढले आहेत. कोरोनाची तिसरी लाट लहान मुलांवरसुद्धा गंभीर दुष्परिणाम करणारी देणारी असल्यामुळे सर्व शासकीय यंत्रणा मागील दीड वर्षापासून स्वतःचा जीव धोक्यात घालून नागरिकांच्या जिवाचे रक्षण करण्यात व्यस्त आहे. अनेक शासकीय कामे त्यातून पडली असताना तीसुद्धा वेळेवर करण्याचा प्रयत्न केले जात आहेत. परंतु, सोमवारी परतवाडा शहरातील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या विश्रामगृहात कोरोना नियम पायदळी तुडविले गेले. अनेक वर्षापासून याच विश्रामगृह परिसरात आरटीओ लर्निंग लायसन्स कॅम्प घेतला जातो. सोमवारच्या शिबिरात येथील दृश्य थक्क करणारे होते. फिजिकल डिस्टन्स व इतर नियम शिबिरासाठी लागू नसल्याचे चित्र येथे होते.

बॉक्स

लग्नासाठी ५०, लायसन्ससाठी ३०० माणसे ?

सार्वजनिक कार्यक्रम लग्न समारंभ व इतरही कार्यक्रमात पन्नासपेक्षा अधिक लोकांना एकत्र येण्यास बंदी आहे. यासाठी तहसीलदार व इतर अधिकाऱ्यांची परवानगी आवश्यक आहे. मात्र परतवाडा येथील आरटीओच्या लायसन्स कॅम्पसमध्ये ऑनलाईन २०० नागरिकांची नोंदणी झाली असली तरी प्रत्यक्षात ३०० पेक्षा अधिक नागरिक दिसून आले. शासनाच्या नियमांची शासकीय अधिकारी अवहेलना करीत होते.

बॉक्स

काम एकाचे, सोबत दोघे

आरटीओ विभागाने शुक्रवारी ऑनलाईन नवीन दुचाकी, चारचाकी वाहन परवाना नोंदणीनंतर उमेदवारांना सोमवारी परतवाडा येथील कॅम्पमध्ये बोलावले होते. परतवाडा, अचलपूर, चिखलदरा, चांदूरबाजार, अंजनगाव या तालुक्यांतील उमेदवारांसमवेत दोन नागरिक आल्याने गर्दी झाली. दस्तुरखुद्द मोटर वाहन निरीक्षक या ठिकाणी बसले होते. गर्दीला आवर घालण्यासाठी आरटीओचा कुठल्याच प्रकारे अधिकारी-कर्मचारी नव्हता, हे विशेष

कोट

Web Title: The fuss of the Corona Rules at the Learning License Camp

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.