इयर एन्डिंगला १९ गुन्ह्याचे ‘डिटेक्शन’; दहा आरोपींना अटक, ४.७४ लाखांचा मुद्देमाल जप्त
By प्रदीप भाकरे | Published: January 10, 2023 06:31 PM2023-01-10T18:31:42+5:302023-01-10T18:33:14+5:30
गाडगेनगर पोलिसांचे यश
अमरावती : गाडगेनगर पोलिसांनी सन २०२२ च्या डिसेंबर महिन्यात तब्बल १९ गुन्हे उघडकीस आणले आहेत. त्यातील दहा आरोपींना अटक करण्यात आली असून त्यांच्याकडून ४ लाख ७४ हजार ९०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. सहायक पोलीस आयुक्त पुनम पाटील व ठाणेदार आसाराम चोरमले यांच्या नेतृत्वात ‘टीम गाडगेनगर’ने हे यश प्राप्त केले.
ठाण्याच्या हद्दीत घडलेल्या जबरी चोरी, घरफोडी, दुचाकी चोरीचे गुन्हे उघडकीस आणून त्यांना प्रतिबंध घालण्यासाठी पोलीस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी, उपायुक्त सागर पाटील व सहाय्यक आयुक्त पूनम पाटील यांनी गुन्हे शोध पथकाची विशेष बैठक घेऊन सूचना दिल्या होत्या. त्यानुसार गुन्हे शोध पथकाने डिसेंबर २०२२ या एक महिन्यात ठाण्यात दाखल १९ गुन्हे उघडकीस आणले. त्यामध्ये जबरी चोरीचे २, घरफोडी ८ गुन्हे, दुचाकी चोरी २, चारचाकी चोरी २, मंदिरातील चोरीचे २ व अन्य चोरीच्या ३ गुन्ह्यांचा समावेश आहे.
या गुन्ह्यांत अमनदीपसिंह अजितसिंह संधू (रा. चौका साहिल, पंजाब), संतोष मधुकर भालेराव (रा. रमाबाई आंबेडकरनगर), उमेश अवधुत खंडारे (रा. रमाबाई आंबेडकर नगर), मुक्ता आकाश धर्माळे (रा. वृंदावन कॉलनी), मोहीत उर्फ सुदर्शन सतीश राऊत (रा. व्यंकटेश टाऊनशीप, भातकुली मार्ग, अमरावती), आकाश साहेबराव वानखडे (रा. विलासनगर), अजय ज्ञानेश्वर इंगळे (रा. भीमनगर), संदेश प्रभूदास नवरे (रा. बेलपुरा), सागर संतोष काकणे (रा. विलासनगर), विजय सूर्यभान कीर्तक (रा. रमाबाई आंबेडकर नगर) व सर्वेश जानराव भुते (रा. पेन्शनपुरा, परतवाडा) यांना अटक करण्यात आली.
यांनी केली कारवाई
ही कारवाई गाडगेनगरचे ठाणेदार आसाराम चोरमले यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक महेश इंगोले, सायबरचे सहाय्यक पोलीस निरीक्षक रवींद्र सहारे, पोलीस उपनिरीक्षक पंकज ढोके, अंमलदार ईशय खांडे, निळकंठ गवई, अनिल तायवाडे, गजानन बरडे, गणेश तंवर, आस्तिक देशमुख, सचिन बोरकर, परवेज, समीर, उमेश भोपते, राज देविकर, जयसेन वानखडे, प्रकाश किल्लेकर, सागर धरमकर, सुशांत प्रधान, संग्राम भोजने, पंकज गाडे, मनीष नशीबकर यांनी केली.