गाडगेबाबांची जन्मभूूमी जगाच्या नकाशावर आणणार
By admin | Published: January 24, 2016 12:12 AM2016-01-24T00:12:40+5:302016-01-24T00:12:40+5:30
झाडूच्या माध्यमातून समाजमनाची स्वच्छता व शिक्षणाचा संदेश देणाऱ्या संत गाडगेबाबांचे कार्य महान आहे.
पालकमंत्री : शासन, लोकसहभागातून राबविणार कार्यक्रम
अमरावती : झाडूच्या माध्यमातून समाजमनाची स्वच्छता व शिक्षणाचा संदेश देणाऱ्या संत गाडगेबाबांचे कार्य महान आहे. त्यांचे कार्य जगासमोर आणणे आवश्यक असून शासन व लोकसहभागातून हे कार्य शासन करणार असल्याचे प्रतिपादन पालकमंत्री प्रवीण पोटे यांनी शुक्रवारी केले.
शेंडगाव ग्रामपंचायतीच्यावतीने पालकमंत्री पोटे यांचा सत्कार करण्यात आला, यावेळी ते बोलत होते. पालकमंत्री पोटे पुढे बोलताना म्हणाले की, गाडगे महाराजांचे कार्य महाने असून त्यांचे विचार प्रत्येकाने अंगिकारणे आवश्यक आहे. येणाऱ्या काळात शेंडगावच्या विकासाकडे आपण आवर्जून लक्ष देणार असून शेंडगावात येणाऱ्या प्रत्येकाने संत गाडगे महाराजांच्या कायार्तून प्रेरणा घेऊनच जावे, अशी प्रतेयकाची धारणा असायला पाहिजे. कोणत्याही कार्यात लोकसहभाग नसेल तर लोकांची आत्मीयता त्या कार्यात राहत नाही. आगामी काळात लोकसहभाग व शासनमिळून शेंडगावचा विकास करण्यावर आपला भर राहील, असे पोटे म्हणाले. संत गाडगेबाबा यांच्या मंदिराला पालकमंत्री पोटे यांनी सदिच्छा भेट दिली. पालकमंत्र्यांनी यावेळी गावकरी व संरपंचासोबत शेंडगावच्या विकास आराखड्याबाबत चर्चा केली. यावेळी उपविभागीय अधिकारी इब्राहिम चौधरी, ग्रामपंचायत सदस्य सरपंच खंडारे आदी उपस्थित होते.