गाडगेबाबांच्या तर्कशुद्ध विचारांची समाजाला गरज

By admin | Published: June 4, 2014 11:22 PM2014-06-04T23:22:24+5:302014-06-04T23:22:24+5:30

संत गाडगेबाबांनी ग्रामसफाई सोबतच समाजातील अनिष्ठ रुढीतील मानसिक घाण साफ करण्याचे कार्यही हाती घेतले होते. संत गाडगेबाबांच्या अशा क्रांतिकारी व तर्कशुध्द विचारांची समाजाला गरज असल्याचे

Gadgebaba's logical thinking needs the community | गाडगेबाबांच्या तर्कशुद्ध विचारांची समाजाला गरज

गाडगेबाबांच्या तर्कशुद्ध विचारांची समाजाला गरज

Next

अमरावती : संत गाडगेबाबांनी ग्रामसफाई सोबतच समाजातील अनिष्ठ रुढीतील मानसिक घाण साफ करण्याचे कार्यही हाती घेतले होते. संत गाडगेबाबांच्या अशा क्रांतिकारी व तर्कशुध्द विचारांची समाजाला गरज असल्याचे प्रतिपादन अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे राजीव खिराडे यांनी केले.
स्थानिक किरणनगर येथे किरण युवक व्यायाम व क्रीडा मंडळ, सर्वज्ञ वाचनालय व अंधश्रध्दा निर्मूलन समितीच्यावतीने ‘संत गाडगेबाबा विचार व कार्य’ या विषयावर चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी खिराडे बोलत होते.
व्यासपीठावर प्रमुख अतिथी म्हणून अंनिसचे बबनराव बेलसरे, नगरसेवक दीपक पाटील, रवींद्र परघणे, भालचंद्र रेवणे, सहदेव पाटील, संजय वानखडे, अमृतराव हरणे यांची प्रमुख उपस्थिती होती. अध्यक्षस्थानी नामदेवराव डेहणकर होते. यावेळी आयोजित निबंध स्पर्धेचा बक्षीस वितरण सोहळा पार पडला.
प्रथम पुरस्कार अनुष्का डोंगरे, व्दितीय प्रतीक्षा खंडारे व तृतीय क्रमांक उषा आवारे यांनी पटकाविला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक अजय केणे, संचालन भैया मुंदाणे यांनी केले.  संजय महल्ले यांच्या आभार प्रदर्शनाने कार्यक्रमाची सांगता झाली.
कार्यक्रमासाठी रवींद्र हांडे, विजय कुळकर्णी, श्रीकांत तभाने, बबन पोरे,  गणेश तालन, रमेशराव विंचुरकर, रामचंद्र लांडगे, धीरज पोहणेकर, सुधीर घुमटकर, जयंत कोकणे, नीलेश आवारे, संदीप बनसोड, गजेंद्र पुरी, नीळकंठ ठवळी, मनोज किंचबरे आदीचे सहकार्य लाभले.
 

Web Title: Gadgebaba's logical thinking needs the community

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.