गजभियेच्या पत्नीला पीसीआर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 27, 2018 10:42 PM2018-03-27T22:42:36+5:302018-03-27T22:42:36+5:30

शीतल पाटील हत्याकांडातील मुख्य आरोपी अ‍ॅड. सुनील गजभियेची पत्नी राजेश्रीला गाडगेनगर पोलिसांनी सोमवारी सायंकाळी अटक केली.

Gajabhai's wife to PCR | गजभियेच्या पत्नीला पीसीआर

गजभियेच्या पत्नीला पीसीआर

googlenewsNext
ठळक मुद्देआज सुनीलची पेशी : विहिरीचा उपसा करून मोबाइलची शोधमोहीम

आॅनलाईन लोकमत
अमरावती : शीतल पाटील हत्याकांडातील मुख्य आरोपी अ‍ॅड. सुनील गजभियेची पत्नी राजेश्रीला गाडगेनगर पोलिसांनी सोमवारी सायंकाळी अटक केली. मंगळवारी तिला न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने तिला १ एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावली. दरम्यान, पोलिसांनी एक्स्प्रेस हायवेवरील जुना टोलनाका स्थित घटनास्थळीच्या विहिरीतील पाणी उपसून मोबाइलचा शोध घेतला.
शीतलचा बूट काढला विहिरीबाहेर
सुनील गजभिये व रहमान यांनी शीतलचा मृतदेह विहिरीत फेकल्यानंतर तिचा मोबाइलसुद्धा विहिरीत टाकला. सदर विहीर मोठी असून, त्यात ४० फुटांपर्यंत पाणी असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. मंगळवारी गाडगेनगरचे पोलीस निरीक्षक मनीष ठाकरे यांच्या मार्गदर्शनात एपीआय जी.टी. पवार यांनी अग्निशमन दलाच्या मदतीने मशीनने विहिरीचा उपसा सुरू केला. पाणी पुष्कळ असल्यामुळे पाण्याचा उपसा तळापर्यंत झाला नाही. तथापि, शीतलचा दुसरा बूट विहिरीतून बाहेर काढण्यात आला. यावेळी पोलिसांनी सुनील गजभियेला या विहिरीजवळ आणले होते.
दरम्यान, सामाजिक कार्यकर्त्या शीतल पाटील यांच्या डोक्यावर लोखंडी रॉडने प्रहार करून सुनील गजभियेने हत्या केली आणि दोघांनी मृतदेह विहिरीत फेकल्याची कबुली रहमानने गाडगेनगर पोलिसांना दिली आहे. हत्येचे गूढ उकलल्यानंतर आता गाडगेनगर पोलीस गुन्ह्यात वापरलेले शस्त्र जप्त करण्यासाठी सुनील व रहमानची पोलीस कोठडीत चौकशी करीत आहेत. या आरोपींना आश्रय देणाऱ्या गडचिरोलीतील शिवदास गोंडाणेला पोलिसांनी अटक केली आहे. सोमवारी पोलिसांनी सुनील गजभियेची पत्नी राजेश्री (४५, रा. कुसुम कॉलनी, रविनगर) हिला अटक करण्यात आली. राजेश्रीने हत्येच्या सुनियोजित कटात आरोपींना मदत केली. तिने सुनीलचा मोबाइल घरी ठेवला तसेच रहमानला शहराबाहेर राहण्याचा सल्ला देऊन त्याच्या बँक खात्यात पैसे जमा केले. या अनुषंगाने गाडगेनगर पोलिसांनी राजेश्रीविरुद्ध कलम २०१, २१२, १२० (ब) अन्वये गुन्हा नोंदवून तिला अटक केली आहे. गाडगेनगर पोलिसांच्या ताब्यातील सुनील गजभियेची पोलीस कोठडी २८ मार्च रोजी संपेल. त्याला बुधवारी न्यायालयात हजर केले जाणार आहे.
 

Web Title: Gajabhai's wife to PCR

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.