आष्टी येथे जुगार पकडला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 25, 2021 04:14 AM2021-03-25T04:14:52+5:302021-03-25T04:14:52+5:30
अमरावती : शहर गुन्हे शाखेने आष्टी येथे जुगारावर कारवाई करून जुगाराच्या साहित्यासह १,७४५ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. ही कारवाई ...
अमरावती : शहर गुन्हे शाखेने आष्टी येथे जुगारावर कारवाई करून जुगाराच्या साहित्यासह १,७४५ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. ही कारवाई मंगळवारी करण्यात आली.
याप्रकरणी आरोपी बंडू श्रीराम पायताळे (५२, रा. आष्टी), दिनेश गोहाड(५०, रा. मार्की) विरुद्ध गुन्हा नोंदविला.
------------------------------------------------------------
------------------------------------------------
पाळा येथे दारू जप्त
अमरावती : बडनेरा पोलिसांनी पाळा येथे कारवाई करून ५५० रुपयांची अवैध दारू जप्त केली. ही कारवाई मंगळवारी करण्यात आली. आरोपी नितीन सुरेश गायकवाड (४०, रा. नांदगावखंडेश्वर) विरुद्ध गुन्हा नोंदविला.
------------------------------------------------------
गवळीपुऱ्यात दारू जप्त
अमरावती : फ्रेजरपुरा पोलिसांनी येथील गवळीपुऱ्यात कारवाई करून १,०३० रुपयांची प्लास्टिकच्या डबकीतील अवैध दारू मंगळवारी जप्त केली. आरोपी हुसेन गंगा बेनीवाले (५०, रा. गवळीपुरा), विरुद्ध गुन्हा नोंदविला आहे.
-------------------------------------
जुना बायपास मार्गावर दारू जप्त
अमरावती : राजापेठ पोलिसांनी येथील गोल्डन आर्क बार जुना बायपास येथे सोमवारी कारवाई करून १,६०० रुपयांची अवैध दारू जप्त करण्यात आली. आरोपी गिरीश सुदाम झाबांनी (२५, रा. कंवरनगर) याच्याविरोधात गुन्हा नोंदविला.
----------------------------------
गळफास घेऊन आत्महत्या
अमरावती : गाडगेनगर पोलीस ठाणे हद्दीतील एका ४६ वर्षीय इसमाने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना मंगळवारी संतोषीनगरात घडली. नीळकंठ चंपतराव शेंडे (४६, रा. संतोषी नगर) असे मृताचे नाव आहे. पोलिसांनी याप्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद केली. आत्महत्येचे कारण कळू शकले नाही.
--------------------------------------
जुनी टाकसाळ येथे इसमाची आत्महत्या
अमरावती : खोलापुरीगेट ठाणे हद्दतील जुनी टाकसाळ येथील गुल्हाणे यांच्या वाड्यातील रहिवासी असलेल्या एका ४५ वर्षीय इसमाने बल्लीला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना मंगळवारी घडली. गजानन महादेव गुल्हाने (४५, रा. भोलेश्वर मंदिराजवळ) असे मृताचे नाव आहे. सदर इसम हे कचऱ्याच्या गाडीवर चालक म्हणून काम करीत होते. याप्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद केली.