जुगार अड्ड्यावर धाड, आठ दुचाकी व चार लाखांच्या मुद्देमालासह तीन जण अटकेत
By प्रदीप भाकरे | Published: November 8, 2022 02:44 PM2022-11-08T14:44:25+5:302022-11-08T14:55:40+5:30
आठ जण फरार
अमरावती : ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेने चांदूरबाजार तालुक्यातील कुऱ्हा देशमुख येथील जुगार अड्ङा उध्वस्त केला. तेथून तीन जुगाऱ्यांना अटक करण्यात आली. तर आठ जण फरार झाले. तेथून आठ दुचाकींसह एकूण चार लाखांचा मुद्देमला जप्त करण्यात आला.
एलसीबीनुसार, गफ्फार बेग ऊर्फ गब्बर मेहमुद बेग (४२), पवन ऊर्फ टाबु रमेश धिवधोंडे (२७) व निलेश गोवींदराव भुयारकर (३८, सर्व रा. कुऱ्हा देशमुख) अशी अटक आरोपींची नावे आहेत. फरार आरोपी देखील कुऱ्हा देशमुख येथील रहिवासी आहेत. स्थानिक गुन्हे शाखेचे पथक सोमवारी शिरजगाव कसबा हद्दीत पेट्रोलिंग करीत असताना, काही आरोपी हे कुऱ्हा देशमुख येथील भवानी पांदन रस्त्याने एका शेतात झाडाखाली एक्का- बादशहा नावाचा जुगार खेळत आहेत, अशी माहिती मिळाली. त्यावरून धाड घातली असता, आरोपीच्या ताब्यातून आठ दुचाकी, रोख रक्कम, व जुगाराचे साहित्य असे मिळून एकूण ३ लाख ९३ हजार ७०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
आरोपींना पुढील कार्यवाहीकरीता शिरजगाव कसबा ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले आहे. पोलीस अधीक्षक अविनाश बारगळ, अप्पर पोलीस अधीक्षक शशिकांत सातव, उपविभागीय पोलीस अधिकारी अतुलकुमार नवगिरे, स्थानिक गुन्हे शाखेचे तपन कोल्हे यांचे मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरिक्षक प्रशांत गिते, उपनिरिक्षक मुलचंद भांबुरकर व अमोल मानतकर, युवराज मानमोठे, मंगेश लकडे, स्वप्नील तंवर, अमोल कपले, भुमेश्वर तायडे, संदीप नेहारे यांनी ही कारवाई केली आहे.