पाळा शिवारातील २१.४४ लाखांचा जुगार उध्वस्त, १३ जुगारी अटकेत
By प्रदीप भाकरे | Published: July 19, 2023 01:21 PM2023-07-19T13:21:45+5:302023-07-19T13:22:45+5:30
४.४५ लाख रुपये कॅश : स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई
अमरावती : ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेने मोर्शी तालुक्यातील पाळा शिवारात सुरू असलेल्या जुगारावर धाड घालून १३ जुगाऱ्यांना अटक केली. १८ जुलै रोजी ही कारवाई करण्यात आली. आरोपींच्या ताब्यातुन ४ लाख ४५ हजार १८० रुपये रोख, नऊ मोबाईल, ११ दुचाकी व दोन चारचाकी वाहने असा एकुण २१ लाख ४४ हजार ६०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
स्थानिक गुन्हे शाखेचे पथक मोर्शी पोलीस ठाण्याच्या हददीत गुन्हेगारांचा शोध घेत असतांना पाळा शिवारात काही इसम ५२ पत्यांवर जुगार खेळत असल्याची माहिती त्यांना मिळाली. त्या माहितीवरून धाड टाकली असता तेथे १३ जण जुगार खेळताना आढळून आले. ताब्यात घेण्यात आलेल्या जुगाऱ्यांमध्ये अमित महेन्द्रप्रसाद यादव (नांदगाव पेठ), सार्थक विजय आमझरे (मोर्शी), अंकुश भिमराव बोरवार (रा. बेनोडा), मंगेश गिरिधर हिमाने (रा. तिवसा), मनोज भुसाटे (रा. गिट्टी खदान, मोर्शी), शेख अमीन शेख अहमद, रा. कडबी बाजार, अमरावती), ७) जुबेर अहमद अ. हमीद (रा. पेठपूरा, मोर्शी), ८) योगेश्वर गणेश्वर (रा. श्रीकृष्णपेठ, मोर्शी), ९) गौरव नागेश अग्रवाल (कांडली, परतवाडा), ऋषिकेश अरुणराव (रा. अचलपुर), सुरेश टेकचंद नेमाणी (रा. कृष्णानगर, अमरावती), मोहन निपाणे (रा. मोर्शी) व १३) संदीप ऊर्फ टिल्या जहकार (रा. मोर्शी) यांचा समावेश आहे. यातील मोहन निपाने हा फरार आहे. अटक जुगाऱ्यांना मोर्शी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.
‘टिम एसपीं’ची मेगा कारवाई
पोलीस अधिक्षक अविनाश बारगळ, अपर पालोस अधीक्षक शशिकांत सातव यांच्या मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेचे किरण वानखडे, पोलीस उपनिरिक्षक नितीन चूलपार, पोलीस अंमलदार संतोष मुंदाणे, रविंद्र बावणे, बळवंत दाभणे, सचिन मिश्रा, भूषण पेठे, पंकज फाटे व निलेश मेहरे यांच्या पथकाने केली.