‘खेल’ तोच ‘शब्द’ नवे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 12, 2021 04:09 AM2021-07-12T04:09:34+5:302021-07-12T04:09:34+5:30

जिल्हा काँग्रेसने शुक्रवारी हायकमांडच्या आदेशावरून अमरावती येथील जिल्हाधिकारी कार्यालयापुढे महागाईविरोधात आंदोलन केले. या आंदोलनाची तयारी गेल्या काही दिवसांपासून होत ...

‘Game’ is the same as ‘word’ | ‘खेल’ तोच ‘शब्द’ नवे

‘खेल’ तोच ‘शब्द’ नवे

Next

जिल्हा काँग्रेसने शुक्रवारी हायकमांडच्या आदेशावरून अमरावती येथील जिल्हाधिकारी कार्यालयापुढे महागाईविरोधात आंदोलन केले. या आंदोलनाची तयारी गेल्या काही दिवसांपासून होत असल्याने जिल्हाभरातील दिग्गज नेते उपस्थित राहून ‘जोर’से ‘शोर’ करीत होते. वेगवेगळे नारे देण्यात येत होते. त्यापैकी एक चिरपरिचित नारा म्हणजे - वाह रे ....... तेला खेल, सस्ती दारू महंगा तेल. आता तेल महागले हे सत्य आहेच, पण दारू स्वस्त आहे कुठे? देशी असो वा विदेशी, सर्वच दारूच्या किमतींमध्ये वाढ झाली आहे. हे लक्षात येताच एका पक्षधुरिणाने आंदोलकांना थांबविले आणि नारा बदलवा, असे फर्मान काढले. त्यात चपखल बसले ते महागडे होत चाललेले डिझेल आणि नारा तयार झाला - वाह रे ....... तेरा खेल, महंगा डिझेल महंगा तेल. जिल्हाधिकारी कार्यालयाकडून ये-जा करणाऱ्यांमध्ये या अभिनव नाऱ्याची चर्चा होती.

- गणेश वासनिक, अमरावती

Web Title: ‘Game’ is the same as ‘word’

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.