‘गण गण गणात बोते’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 7, 2018 10:22 PM2018-02-07T22:22:05+5:302018-02-07T22:23:43+5:30

शेगाव निवासी राजाधिराज योगिराज संत गजानन महाराजांच्या प्रकटदिनानिमित्त शहरात ठिकठिकाणी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.

'Gan Gana sings Ganat' | ‘गण गण गणात बोते’

‘गण गण गणात बोते’

Next
ठळक मुद्दे‘श्रीं’चा जयघोष : लाखो भाविकांनी घेतला महाप्रसाद

आॅनलाईन लोकमत
अमरावती : शेगाव निवासी राजाधिराज योगिराज संत गजानन महाराजांच्या प्रकटदिनानिमित्त शहरात ठिकठिकाणी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. संत गजानन महाराजांच्या जयघोषाने अंबानगरी दुमदुमली. मंदिरात दर्शनाला येतानाच भाविक ‘गण गण गणात बोते’च्या घोषात दंग होत होते. अनेक ठिकाणी भाविकांनी दर्शनासाठी सकाळपासूनच गर्दी केली होती. लाखो भाविकांनी महाप्रसादाचा आस्वाद घेतला.
खापर्डे वाड्यात झाली महाआरती
अमरावती : राजकमल चौकातील श्रीमंत दादासाहेब खापर्डे यांच्या खापर्डे वाड्यात संत गजानन महाराज यांच्या प्रकटदिन महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. यानिमित्त बुधवारी सकाळी शेकडो भाविकांनी या ठिकाणी महाआरती केली. येथे बेसन भाकर व मसाला भात अशा महाप्रसादाचे वाटप यावेळी करण्यात आले. या वाड्याला दादासाहेब खापर्डे हयात असताना संत गजानन महाराजांचा पदस्पर्श लाभला होता. त्यामुळे या वाड्याला आध्यत्मिक महत्त्व आहे. दासगणू महाराजांच्या पोथीतही तसा उल्लेख आढळून येतो. त्यामुळे येथे भाविकांच्या श्रद्धा जुळल्या आहेत. या ठिकाणी ‘श्रीं’ची विधिवत पूजा व आरती करण्यात आली. यावेळी पद्माकर गोलाईतकर, अजय मामर्डे, कल्पना पडोळे, लक्ष्मी शर्मा, राजू शर्मा, नितीन गौर, छोटू जाधव, राजेंद्र वर्मा, प्रकाश गावंडे, मंगेश आलेगावकर, चंदू पिंपळे, विजय ठाकूर, प्रतीक देशमुख, प्रशांत सावंत, राजेंद्र देशमुख, राजेंद्र परिहार, डी.के. सिंह, भूषण परिहार मिलिंद लेंधे यांच्यासह शेकडो भाविक उपस्थित होते.
गजानन महाराज मंदिर समर्थनगर
समर्थनगर-विवेकानंद कॉलनी येथील श्री संत गजानन महाराज मंदिर संस्थान मंदिरात भाविकांनी सकाळपासूनच दर्शनासाठी रांग लावली. या ठिकाणी सुबक मूर्ती आहे. संस्थानच्यावतीने श्रीमद् भागवत सप्ताहाचेही आयोजन करण्यात आले होते. येथील मंदिराची उभारणी ही २०११ मध्ये करण्यात आली आहे. दुपारी १२ पासून या ठिकाणी महाप्रसादाचे वाटप भाविकांना करण्यात आले. हजारोंच्या संख्येने भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला. मंदिर संस्थानचे अध्यक्ष अजय जगताप व सचिव मनीष देशमुख यांच्यासह इतर पदाधिकाऱ्यांनी आयोजनासाठी अथक परिश्रम घेतले.
हजारो भाविकांनी घेतला महाप्रसादाचा लाभ
रेल्वे स्टेशन ते इर्विन मार्गातील श्री संत गजानन महाराज मंदिरात प्रकटदिनानिमित्त दर्शनासाठी भाविकांनी अलोट गर्दी केली होती. या ठिकाणी सकाळी ११ पासून महाप्रसादाचे वाटप सुरू झाले. पोळी-भाजी व लाडू असा महाप्रसाद या ठिकाणी २० हजारांपेक्षा भाविकांनी घेतला. या ठिकाणी साईबाबा व गजानन महाराजांच्या मूर्तीचे दर्शन भाविकांनी मोठ्या श्रद्धेने घेतले. या मंदिराचे विश्वस्त त्र्यंचंद हंसवार व पदाधिकाºयांनी चोख व्यवस्था केली होती. परिसरात हार विक्रीची दुकाने लागली होती. भाविकांच्या सुरक्षिततेसाठी रस्त्याची एक बाजू बंद करण्यात आली होती. रात्री उशिरापर्यंत भाविकांनी या ठिकाणी दर्शन घेतले.

Web Title: 'Gan Gana sings Ganat'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.