श्रीक्षेत्र वायगाव येथील गणेशमूर्ती तब्बल सहाशे वर्षांपूर्वींची

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 3, 2019 12:59 AM2019-09-03T00:59:35+5:302019-09-03T00:59:49+5:30

पांडव अज्ञातवासात चिखलदरा येथे आले होते. परतीच्या वेळी याच ठिकाणी मूर्तीचे दर्शन घेऊन त्यांनी आपला अज्ञातवास संपविला, अशी आख्यायिका आहे. अशा या ऐतिहासिक सहाशे वर्ष पूर्वी खोदकामात सापडलेलि गणेश मुर्ती महाराष्ट्रातील लाखो भाविकांच्या मनात बसली आहे .

Ganesh idol at Shreekshetra Waigaon was almost six hundred years ago | श्रीक्षेत्र वायगाव येथील गणेशमूर्ती तब्बल सहाशे वर्षांपूर्वींची

श्रीक्षेत्र वायगाव येथील गणेशमूर्ती तब्बल सहाशे वर्षांपूर्वींची

googlenewsNext
ठळक मुद्देमहाभारतकाळाशी नाते : पांडवांनी येथेच दर्शन करून संपविला होता वनवास

लोकमत न्यूज नेटवर्क
टाकरखेडा संभू : महाभारतकालीन इतिहासाचा वारसा सांगणाऱ्या भातकुली तालुक्यातील श्रीक्षेत्र वायगाव येथे उजव्या सोंडेची अद्भुुत गणेशमूर्ती पहावयास मिळते.
पांडव अज्ञातवासात चिखलदरा येथे आले होते. परतीच्या वेळी याच ठिकाणी मूर्तीचे दर्शन घेऊन त्यांनी आपला अज्ञातवास संपविला, अशी आख्यायिका आहे. अशा या ऐतिहासिक सहाशे वर्ष पूर्वी खोदकामात सापडलेलि गणेश मुर्ती महाराष्ट्रातील लाखो भाविकांच्या मनात बसली आहे .
महाराष्ट्रात दोनच ठिकाणी सिद्धिविनायकाची ही मूर्ती पाहावयास मिळेल मुंबई नंतर अमरावती जिल्ह्याच्या भातकुली तालुक्यातील वायगाव येथे ही दिव्य सुंदर मूर्ती आहे., या सिद्धीविनायकाच्या मूतीर्चा इतिहास पाहता जुन्या लोकांच्या सांगण्यावरून महाभारतातील विराट पर्वापर्यंत मूतीर्ची आख्यायिका ऐकन्यात मिळते,तेव्हा पांडव अज्ञातवासात असताना विराट कडे होते तेव्हा याच मूर्तीच्या दर्शनाने त्यांच्या अज्ञातवासातील वनवासी जीवन संपले. ही मूर्ती मध्यावर्ती मुघल काळात भूमिगत ठेवण्यात आली होती, या गावाच्या सभोवताल असलेले अचलपूर, दारापुर ,खोलापूर ही गावे मुघलांच्या ताब्यात होती, त्यानंतर सहाशे वर्षाच्या अंदाजे काळ गेला त्यामुळे मूतीर्चा अचूक ठावठीकाणा लागला नव्हता, लोकांना साक्षात्कार व्हायचा ,पण मूर्ती सापडत नव्हती ,आणि अचानक खोदकामात ही मूर्ती वागावय येथे इंगोले यांच्या घरी सापडली, तो काळ सोळाव्या शतकातला होता ,तेव्हापासून मूर्ती वाडा रुपी मंदिरात प्रतिष्ठित करण्यात आली व मूतीर्चा पूवार्पार इंगोले कुटुंबात असलेली सेवा पुन्हा सुरू झाली ,ही आजही कायम आहे गणेश मूर्ती बद्दल ऐकताच महाराष्ट्रातून लाखो भाविक भक्त वायगाव च्या वाटेवर येऊ लागले, कालांतराने गणेशभक्तांची गर्दी वाढत असल्यामुळे इंगोले परिवाराच्यावतीने भक्तांच्या सुविधांसाठी ट्रस्टची स्थापना केली ,त्यानंतर येथे मंदिर बांधण्यात आले त्यासाठी इंगोले कुटुंबातील लोकांनी शेती देऊन या मंदिराचे निर्माण कार्य पूर्ण केले ,याचे व्यवस्थापन लालजी पाटील ,सितारामजी पाटील, तुळशीराम पाटील, शिवराम पाटील ,तुकारामजी पाटील ,श्रीराम पाटील व दयाराम पाटील यांच्याकडे आहे ट्रस्टची धुरा सध्या अध्यक्ष या नात्याने विलासराव तुकाराम इंगोले यांच्याकडे आहे.

सिद्धिविनायक मूर्तीचे वैशिष्ट्य
सिद्धिविनायकाची उजव्या सोंडेची मूर्ती येथे आहे. उजव्या बाजूला सिद्धी व डाव्या बाजूला रिद्धी आहे. एकदंत, पद्म, शंख चिन्हांकित आहे. हातातील माळ व मोदक ऐहिक जीवनातील समृद्धीचा संकेत देतात. उत्तरायन व दक्षिणायन होताना सूर्योदयाची पहिली किरणे मूर्तीवर पडतात.

Web Title: Ganesh idol at Shreekshetra Waigaon was almost six hundred years ago

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.