जुळया शहरात बनावट सातबारा बनविणारी टोळी !

By Admin | Published: August 25, 2016 12:11 AM2016-08-25T00:11:25+5:302016-08-25T00:11:25+5:30

शासनाने आॅनलाईन खरेदीचे आदेश देऊन सुद्धा खरेदी न होऊ शकणाऱ्या शेताची खरेदी-विक्री बनावट दस्तऐवजांच्या आधारे करण्यात आल्याचा ...

A gang of fake seas! | जुळया शहरात बनावट सातबारा बनविणारी टोळी !

जुळया शहरात बनावट सातबारा बनविणारी टोळी !

googlenewsNext

शेतकऱ्यांची फसवणूक : सहायक दुय्यक निबंधकाने करून दिली खरेदी 
परतवाडा : शासनाने आॅनलाईन खरेदीचे आदेश देऊन सुद्धा खरेदी न होऊ शकणाऱ्या शेताची खरेदी-विक्री बनावट दस्तऐवजांच्या आधारे करण्यात आल्याचा खळबळजनक प्रकार उघडकीस आला आहे. यामध्ये बनावट साताराबारांचा वापर झाल्याने संपूर्ण प्रकरणांची चौकशी करुन गरीब शेतकऱ्यांची फसवणूक टाळण्याची मागणी संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष दिनेश ठाकरे यांनी केली आहे.
यामध्ये बनावट सातबारांचा वापर झाल्याने संपूर्ण प्रकरणाची चौकशी व्हावी, असेही दिनेश ठाकरे यांनी तक्रारीत म्हटले आहे. तक्रारीनुसार, मौजे देवगाव गट नं १६/२, मध्ये ७४ आर. शेत एकलासपूर येथील शेतकरी चेतन विजयराव चौधरी यांनी नीलेश विश्वास आखरे (रा.सावळी दातुरा) यांचेकडून सात लक्ष रुपयांमध्ये नोटरी करुन घेतले होती. या शेताचा सातबारा होऊ शकत नसल्याचे आदेश शासनाचे आहेत. चंद्रभागा मध्यम प्रकल्पाच्या लाभक्षेत्रामध्ये शेत असल्याच्या कारणावरून १५ मार्च २०१४ पासून चेतन चौधरी या शेताची पाहणी करीत आहेत. तीन वर्षात शेतामध्ये ओलिताची व्यवस्था करुन संत्रा झाडांच्या साडेतीनशे कलमा लाऊन ठिबक सिंचनही करण्यात आले. शेणखत, गाळ टाकून जमिनीचा पोत उच्च प्रतीचा केला व संपूर्ण शेतीला जाळीचे कुंपण घातल्याने चेतन चौधरी यांना नोटरी करुन देणाऱ्या नीलेश आखरेच्या डोळयांत हा सर्व प्रकार आला.
वास्तविक या शेताचा मूळ मालक उपेन चंदन बछले असून त्यांच्या नावाचा सातबारा आहे. बछले यांनी आखरेला शेत विकल्यानंतर चेतन चौधरी यांनी हे शेत घेतले होते, हे विशेष.यामुळे परिसरात खळबळ उडाली असून विविध चर्चांना उत आला आहे. (प्रतिनिधी)

बनावट सातबारा अन् खरेदी
चेतन चौधरी यांनी शेताची खरेदी होत नसल्यामुळे नोटरी करुन घेतली होती. त्याच दरम्यान पडिक शेत सुस्थितीत झाल्यामुळे त्याची चांगली किंमत येऊ शकते, हे हेरून नीलेश आखरे याने सहायक दुय्यम निबंधक, अचलपूर यांचेकडे शेताचा बनावट सातबारा तयार करुन मो इरफान मो.रफीक, मो.अमिन मो. रफीक आणि मो.सोहेल मो. रफीक या तीन भावंडाना हे शेत दुसऱ्यांदा विकले. शासनाचा आॅनलाईन खरेदीचा आदेश असताना संबंधित अधिकाऱ्याने त्यावरही कळस करीत आॅफलाईन खरेदी करुन दिली. सातबारा किंवा कुठल्याच प्रकारच्या दस्तऐवजांची तपासणी केली नाही. परिणामी संबंधित अधिकारी सुद्धा या प्रकरणात सहभागी आहेत का, या सर्वाची चौकशी होणे गरजेचे ठरले.

शहरात टोळी सक्रिय?
अचलपूर व परतवाडा या जुळया शहरात दररोज मोठया प्रमाणात खरेदी-विक्रीचे व्यवहार होतात. शासनाच्या खरेदीची वेळ सायं.६ वाजेपर्यत ठरवून दिली आहे. त्यानंतर कुठल्याच प्रकारचे व्यवहार करता येत नाहीत किंवा दस्तऐवजांची तपासणी शासकीय नियमाने आवश्यक असताना बनावट कागदपत्रांवर खरेदी करुन देणाऱ्या टोळीचा संबंधित अधिकाऱ्यांशी संबंध असल्याशिवाय एवढे मोठे कार्य कसे झाले. टोळीने किती शेतकऱ्यांची शेती दुसऱ्यांदा बनावट सातबारा बनवून खरेदी करुन दिली याची तपासणी करण्याची मागणी आहे.

विक्रेत्याच्या मालकी हक्काच्या कागदपत्रांची तपासणी करण्याची जबाबदारी नोंदणी अधिकाऱ्यांची नसल्याचा निर्णय मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपिठाने दिला आहे. खरेदी केलेली कागदपत्रे चेतन चौधरी यांनी सांक्षांकीत केले किंवा नाही, हे माहित नसून तशी या कार्यालयात नोंद नाही.
जी.आर.मोरस्कर
सहायक दुय्यम निबंधक, अचलपूर

Web Title: A gang of fake seas!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.