टोळीयुद्ध पेटले

By admin | Published: November 24, 2014 10:48 PM2014-11-24T22:48:44+5:302014-11-24T22:48:44+5:30

कधीकाळी एकाच टोळीत असलेल्या सदस्यांची यावेळी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर फाळणी झाली. एकमेकांवर जीव वाहून टाकणारे आता एकमेकांच्या जीवावर उठल्याचे रविवारी चांदणी चौकातील गोळीबार

Gang war | टोळीयुद्ध पेटले

टोळीयुद्ध पेटले

Next

विधानसभा निवडणुकीची पार्श्वभूमी : एकाच टोळीची झाली फाळणी
संजय पंड्या - अमरावती
कधीकाळी एकाच टोळीत असलेल्या सदस्यांची यावेळी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर फाळणी झाली. एकमेकांवर जीव वाहून टाकणारे आता एकमेकांच्या जीवावर उठल्याचे रविवारी चांदणी चौकातील गोळीबार प्रकरणाने स्पष्ट झाले असून पोलिसांसाठी या टोळीला रोखणे आव्हान ठरले आहे.
अमरावती शहरातील गुन्हेगारी क्षेत्र नागपूर शहरापेक्षा अव्वल असल्याचे मानले जाते. मात्र पोलीस प्रशासनाने नजीकच्या काळात गुन्हेगारी प्रवृत्तीच्या मुसक्या आवळून गुन्हेगारीवर अंकुश लावला होता. मात्र तीन वर्षांपासून येथील गुन्हेगारी पुन्हा डोके वर काढत आहे. तीन वर्षांपूर्वी शेख जफर आणि बाबाद्दीन टोळीमध्ये वाद उफाळून आला होता. तेव्हा वलगाव मार्गावरील असोरिया पेट्रोल पंपसमोर गोळीबार व प्राणघातक हल्ला झाल्याने शहरात दहशत पसरली होती. त्यावेळी झालेला सघर्ष वर्चस्व स्थापन करण्याकरीता झाल्याचे दिसून आले होते. त्यावेळी पोलीस प्रशासनाने दोन्ही गटाविरुध्द कठोर कारवाई करुन गुन्हेगारी क्षेत्रात आपली छाप सोडली होती. मात्र त्यानंतरही पुन्हा काही बारीकसारीक घटना घडत होत्याच. त्यावेळी शेख जफरच्या टोळीत मोहम्मद ऐफाज सहभागी होता. त्यामुळे पोलिसांनी ऐफाजवर अनेक गुन्हे दाखल केले होते. मात्र लोकसभा व विधानसभा निवडणुकीनंतर या दोन्ही टोळ्या वेगळ्या झाल्याचे निदर्शनास आले होते. शेख जफर काँग्रेसचे नगरसेवक व महापालिकेत उपमहापौर आहेत. नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत ते आपल्या साथिदारांसोबत पक्षाच्या कार्यातही सक्रिय होते.

Web Title: Gang war

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.