आश्रमात 'गँगवॉर'?

By Admin | Published: August 12, 2016 12:07 AM2016-08-12T00:07:15+5:302016-08-12T00:07:15+5:30

प्रथमेश सगणे या विद्यार्थ्याच्या गळ्यावर असलेल्या जखमांचे स्वरुप आणि वैद्यकीय तज्ज्ञांनी त्या अनुषंगाने नोंदविलेला निष्कर्ष ...

'Gangwor' in Ashram? | आश्रमात 'गँगवॉर'?

आश्रमात 'गँगवॉर'?

googlenewsNext

नाना शक्यता : चौफेर व्हावा पोलीस तपास
अमरावती : प्रथमेश सगणे या विद्यार्थ्याच्या गळ्यावर असलेल्या जखमांचे स्वरुप आणि वैद्यकीय तज्ज्ञांनी त्या अनुषंगाने नोंदविलेला निष्कर्ष विचारात घेता आश्रम परिसरात 'गँग' तर अस्तित्वात नाहीत ना, या दिशेनेही तपास केला जाणे आवश्यक आहे.
११ वर्षीय प्रथमेशच्या गळ्यावर जे वार झालेत ते अनंत शंकांना जन्म देणारे आहेत. विषय चिमुकल्या विद्यार्थ्यांच्या जीवनाशी, त्यांच्या भवितव्याशी आणि विश्वशांतीचा प्रसार करणाऱ्या आश्रमाच्या प्रतिमेशी जुळलेला असल्याने या मुद्याचा उहापोह होणे गरजेचे आहे.
प्रथमेशने स्वत:च स्वत:वर वार करवून घेतले असावे, असा एक आश्चर्यकारक प्रसार पिंपळखुट्यातून केला गेला. तज्ज्ञांच्या मते तीनही वार दुसऱ्याने केलेले आहेत. ते धारदार शस्त्राचे आहेत.
वैद्यकीय तज्ज्ञांच्या या अधिकृत मताशिवायदेखील काही मुद्यांवर विचार केला जाऊ शकतो. तीनही वार खोल आहेत. प्रथमेशने आत्मघातासाठी स्वत: ते केले असते तर त्वेषाने केलेला पहिला वार खोल असता. दुसऱ्यांदा त्याची हिम्मत खचली असती. तो कमी खोल असता. तिसरा आणखी उथळ असता. खरे तर चिमुकल्या मुलाने स्वत:वर तीन वार करणेच मुळी अशक्य आहे. तरीही, वार केल्याचे गृहित धरल्यास, आत्मघाताचा निश्चय पक्का केलेली व्यक्ती मृत्यूच्या प्रतीक्षेत निपचित पडली असती. प्रथमेश मात्र वरच्या माळ्यावरून जिवाच्या आकांताने ओरडत खाली पळत सुटला. खाली धावत येत असतानाच रक्तबंबाळ अवस्थेत तो कोसळला. गळ्याची मुख्य रक्तवाहिनी कापली गेल्यानंतर झालेल्या अनियंत्रित भरमसाठ रक्तस्त्रावामुळे तो बेशुद्ध झाला. प्रथमेश आत्मघात करणार असता तर तो जीव मुठीत घेऊन का पळत सुटला असता? आई-वडील सांगतात, प्रथमेश गुणी आहे. सुस्वभावी आहे. संयमी आहे. यंदाच त्याचा प्रवेश आश्रमातील वसतिगृहात करण्यात आला होता. आई-वडिलांपासून लांब राहण्याचा त्याला सरावही झालेला नव्हता. घरी जाण्याची कमालीची ओढ त्याच्या मनी असायची. जन्मदात्यांच्या प्रेमाच्या गडद छायेतून अद्यापही बाहेर न आलेल्या चिमुकल्या प्रथमेशचा मृत्युशी परिचयदेखील झालेला नव्हता. आत्मघात आणि त्याच्या अनेक तऱ्हांशी मग त्याचा कसा संबंध?
प्रथमेशने आत्मघात केला नसल्याचे या तमाम मुद्यांवरून स्पष्ट होते. याचाच अर्थ असा की, कुणी दुसऱ्याने प्रथमेशवर वार केले. प्रथमेशच्या गळ्यावर झालेले वार गंभीर आहेत.

-अखेर बजावली नोटीस दोघांचे बयाणही नोंदविले
चौकशी पथक गठित : 'लोकमत'च्या वृत्तांमधील मुद्यांचा समावेश

'लोकमत'मध्ये गुरुवारी वृत्त प्रकाशित झाल्यानंतर जिल्हा समाजकल्याण अधिकारी भाऊराव चव्हाण यांनी अखेर वसतिगृहाचे अधीक्षक दिलीप मौजे, वसतिगृह समितीचे प्रमुख बबनराव जवंजाळ आणि श्री संत शंकर महाराज आश्रमाचे सचिव राजेंद्र लुंगे यांना कारणे दाखवा नोटीस बजावली.
शंकरबाबा आश्रमात घडलेल्या गुन्हेगारी प्रकाराची चौकशी करण्यासाठी जिल्हा समाजकल्याण अधिकाऱ्यांनी द्विसदस्यीय विशेष चौकशी पथक स्थापित केले. गुरुवारी पिंपळखुट्याच्या आश्रमात हे पथक धडकले. 'लोकमत'ने उपस्थित केलेल्या मुद्यांच्या आधारे दिलीप मौजे, बबनराव जवंजाळ यांचे बयाण या पथकाने नोंदविले. राजेंद्र लुंगे यांच्या नावे जारी झालेली नोटीस संस्थेच्या कोषाध्यक्षांनी स्वीकारली.
कारणे दाखवा नोटीशीत उपस्थित करण्यात आलेले प्रश्न ‘लोकमत’च्या वृत्तावर आधारित होते. नाश्ता केल्यानंतर प्रथमेश बाहेर गेला कसा? तो बाहेर गेला त्यावेळी त्याच्यासोबत कुणी होते काय? असेल तर कोण होते?

 

Web Title: 'Gangwor' in Ashram?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.